Blast In Tempo Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: गोरेगावमध्ये टेम्पोत मोठा स्फोट, एकाचा दुर्दैवी मृत्यू; नेमकं काय घडलं?

Blast In Tempo At Goregaon: गोरेगाव पश्चिमेच्या मोतीलालनगरमध्ये एका टेम्पोच्या एसी कॉम्प्रेसरमध्ये स्फोट होऊन दुर्घटना घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली.

Priya More

सचिन गाड, मुंबई

मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. गोरेगावच्या मोतीलालनगरमध्ये टेम्पोमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पश्चिमेच्या मोतीलालनगरमध्ये एका टेम्पोच्या एसी कॉम्प्रेसरमध्ये स्फोट होऊन दुर्घटना घडली. एसी लिकेज होत असल्यामुळे काम सुरू असताना अचानक स्फोट झाला. स्फोटानंतर टेम्पोला भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि आग अटोक्यामध्ये आणली.

टेम्पोमध्ये झालेल्या स्फोटामध्ये एसीची दुरूस्ती करणाऱ्या एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला. सद्दाम हुसेन (२३ वर्षे) या तरुणाचा मृत्यू झाला. तर गोलू नावाचा तरुण गंभीर जखमी झाला. या स्फोटामध्ये टेम्पोचे मोठे नुकसान झाले. टेम्पो जळून खाक झाला आहे. तर त्याठिकाणी आसपास उभ्या असणाऱ्या वाहनांचे देखील नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार! २ महत्त्वाच्या शहरांना जोडणार; जाणून घ्या 'A टू Z' माहिती

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT