3.5 kg Tumor Removed From Patient Neck Saam Tv
मुंबई/पुणे

KEM Hospital: बापरे! मानेतून काढली साडेतीन किलोची गाठ, जगातील पहिलीच घटना

Priya More

भाग्यश्री भुवड, मुंबई

मुंबईतल्या परळ येथील केईएम रुग्णालय (KEM Hospital) चांगलेच चर्चेत आले आहे. केईएम रुग्णालयाने इतिहास रचला आहे. एका रुग्णाच्या मानेतून तब्बल साडेतीन किलोची गाठ डॉक्टरांनी काढली. केईएम रुग्णालयाच्या कान-नाक-घसा या विभागाच्या संपूर्ण टीमने ३ तासांच्या शस्त्रक्रियेदरम्यान ही गाठ काढली. मानेतून कर्करोगाचा धोका नसणारी अत्यंत दुर्मिळ अशी गाठ काढण्याची ही पहिलीच नोंद जगभरातून झाल्याचा दावा केईएम रुग्णालयाकडून करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टिटवाळामध्ये राहणारे ३५ वर्षीय निखिल पालशेतकर यांच्या मानेला गाठ आली होती. ४ वर्षांमध्ये ही गाठ वाढत जाऊन ती भलीमोठी झाली. या गाठीचे वजन तब्बल साडेतीन किलो झाले होते. या गाठीमुळे निखिल पालशेतकर यांना प्रचंड त्रास होत होता. सुरुवातीला ही गाठ लहान असतानाच त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता. पण त्यांनी औषधोपचारांवर विश्वास ठेवत शस्त्रक्रिया करण्यास टाळाटाळ केली. पण ही गाठ दिवसेंदिवस वाढत जाऊन साडेतीन किलोची झाली त्यामुळे त्यांच्याकडे शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे त्यांनी केईएम रुग्णालयात धाव घेतली.

निखिल पालशेतकर यांच्या मानेला आलेल्या या गाठीमुळे त्यांना गेल्या सहा महिन्यांपासून श्वास घ्यायला त्रास होत होता. ही गाठ दुखत नसल्याने त्यांनी दुर्लक्ष केले पण त्याचे वजन वाढल्यामुळे त्यांनी केईएम रुग्णालयात धाव घेत उपचार घेतले. या गाठीमुळे निखिल यांना झोपताना त्रास होत होता. २९ जुलैला निखिल उपचारांसाठी केईएम रुग्णालयात दाखल झाले. डॉक्टरांनी ३ ऑगस्ट रोजी शस्त्रक्रिया करुन त्यांच्या मानेतून साडेतीन किलोची गाठ यशस्वीरित्या काढली. निखिलची प्रकृती चांगली असून लवकरच त्यांना डिस्चार्ज दिला जाणार आहे.

लिम्फॅन्जिओमा हा ट्यूमर साधारणपणे लहान मुलांमध्ये आढळतो. ९० टक्के लहान मुलांमध्ये हा ट्युमर आढळल्याची नोंद जगभरातील प्रसिद्ध जर्नलमध्ये करण्यात आली आहे. केईएम रुग्णालयाच्या ईएनटी विभाग युनिट प्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक डॉ. निलम साठे यांनी त्यांच्या २० वर्षाच्या सेवा कार्यकाळात पहिल्यांदाच एवढा मोठा ट्युमर तरुणाच्या मानेतून शस्त्रक्रियेद्वारे काढला आहे. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे निखल यांनी शस्त्रक्रियेला टाळाटाळ केली होती. पण आता त्यांची शस्त्रक्रिया कमी खर्चात आणि यशस्वीरित्या पार पडली. या शस्त्रक्रियेनंतर निखिल पालशेतकर यांनी डॉक्टरांचे आभार मानले.

डॉ. निलम साठे यांनी सांगितले की, 'आम्ही अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितीत ही गाठ न फोडता शस्त्रक्रिया केली. तरुणाच्या मानेतील स्वरयंत्र, मणका, संपूर्ण मानेला या ट्यूमरने व्यापून टाकले होते. छोट्या-छोट्या नसा, रक्तवाहिन्यांना न धक्का देता शस्त्रक्रिया करायची होती. निष्काळजीपणा रुग्णाच्या जीवावर बेतला असता. पण आम्ही ३ तासांच्या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून रुग्णाची या गाठीपासून कायमस्वरुपी सुटका केली. फक्त ट्युमरच नाही तर आजूबाजूची त्वचा देखील शस्त्रक्रियेद्वारे काढली. ३० बाय २५ सेंटीमीटर आकाराचा ऐवढी मोठी गाठ काढण्याची जगभरातील ही पहिलीच नोंद असावी. आम्ही ही केस जर्नलमध्येही प्रसिद्ध करणार आहोत.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

SCROLL FOR NEXT