Mumbai Airport x
मुंबई/पुणे

Air India च्या विमानात चढण्यासाठी पठ्ठ्या चक्क मुंबई विमानतळाच्या रनवेवर धावला, नंतर जे घडलं त्यानं...

Mumbai Airport : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाच्या रनवेवर एकजण शिरला. विमानात चढण्यासाठी तो रनवेवर धावत सुटला. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्याला ताब्यात घेतले. या घटनेमुळे मुंबई विमानतळावर गोंधळ झाला.

Yash Shirke

Mumbai : मुंबई विमानतळावर विचित्र प्रकार घडला. एका २५ वर्षीय व्यक्तीने सुरक्षारक्षकांना चकवून विमानतळाच्या रनवेवरुन विमानात चढण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी विमानतळावरील पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली. तो ज्या विमानाने प्रवास करणार होता, त्या विमानाचे उड्डाण झाले असे त्याला वाटले. तेव्हा घाबरुन रनवेवर पळत विमानात चढण्याचा त्याने प्रयत्न केला.

मिळालेल्या माहितीनुसार, पीयुष सोनी असे अटक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो कळंबोलीचा रहिवासी आहे. पीयुष सकाळी ९.५० नंतर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला. तो एअर इंडियाच्या विमानाने पाटण्याला चालला होता. पण त्याच्या विमानाची बोर्डिंग डेडलाइन चुकली. विमान आधीच उड्डाण घेत असल्याचे समजताच पीयुष घाबरला. त्याने रनवेवर जात विमानाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पण तो ज्या विमानाच्या दिशेने धावत होता, ते विमान गुजरातमधील भूज येथून आले होते.

पीयुष सोनीने गेट ४२ आणि गेट ४३ दरम्यानचा आपत्कालीन गेट जबरदस्तीने उघडून विमान पार्क करण्यात आलेल्या उच्च-सुरक्षा क्षेत्र असलेल्या एप्रनमध्ये प्रवेश केला. टायरिंगच्या वेळी पीयुष सोनी अचानक धावत आल्याने ग्राउंड स्टाफमधील अधिकारी घाबरले. सुदैवाने त्यावेळी कोणतेही विमान उड्डाण किंवा लँडिंग करत नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

सुरक्षा कर्मचारी आणि सीआयएसएफ यांनी पीयुष सोनीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने 'एका कोच ड्रायव्हरने रनवेजवळ सोडल्याचा दावा केला' पण पुढे ही बाब खोटी असल्याचे समोर आले. मी स्वत:हून विमानात पोहोचण्यासाठी रनवेवर धावत गेलो हे पीयुष सोनीने स्पष्ट केले. कायद्याचे उल्लघंन केल्याबद्दल सोनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीयुष सोनी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC Protest: मोठी बातमी! सरकारच्या जीआरविरोधात न्यायालयात जाणार, छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्ये चर्चा सुरू

Actress : ...मारा, तिचे कपडे काढा, अफेयरच्या अफवांवरुन छळ, मराठी अभिनेत्रीने सांगितला भयानक अनुभव

Manoj jarange patil protest Live: - सरकारच्या जीआर विरोधात ओबीसी नेते न्यायालयात धाव घेणार

Gunratan Sadavarte: मोठी बातमी! सरकारच्या निर्णयावर आक्षेप, गुणरत्न सदावर्ते कोर्टात जाणार

Manoj Jarange: रक्ताने रंगवलेलं पिंपळपान: मनोज जरांगे आणि छत्रपती शिवाजी महाराज एकाच चित्रात|VIDEO

SCROLL FOR NEXT