Worli Hit And Run Case Saam Tv
मुंबई/पुणे

Worli Hit And Run Case: वरळी हिट अँड रन प्रकरण कसं घडलं?, वाचा संपूर्ण घटनाक्रम

Worli Hit And Run Case Complete Sequence: वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी कारचालक तरूण मिहीर शाह फरार आहे. पोलिस मिहीरचा शोध घेत आहेत. ही घटना घडली तेव्हा मिहीर दारुच्या नशेमध्ये होता.

Priya More

मयूर राणे, मुंबई

वरळी हिट अँड रन प्रकरणात (Worli Hit And Run Case) एका महिलाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर आरोपी कारचालक तरूण मिहीर शाह फरार आहे. पोलिस मिहीरचा शोध घेत आहेत. ही घटना घडली तेव्हा मिहीर दारुच्या नशेमध्ये होता. या अपघात प्रकरणात एकएक अपडेट समोर येत आहे. हा अपघात नेमका कसा घडला याचा संपूर्ण घटनाक्रम समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहीर शहा हा २४ वर्षाचा आहे. घटना क्रमानुसार मिहीर शहा हा रात्री जुहू येथील बारमध्ये मद्यप्राशन करत होता. त्या नंतर तो घरी गोरेगावला गेला. घरी गेल्यानंतर त्याने आपल्या ड्राइवरला लॉन्ग ड्राईव्हला जाण्याचे सांगितले. नंतर तो मुंबईत आला आणि मुंबईतून पुन्हा गोरेगावला जाताना मिहीर शहा हा स्वतः गाडी चालवत होता. त्याचवेळी अट्रिक मॉल जवळ अपघात झाला. घटना घडली तेव्हा मिहीर शहा हा दारुच्या नशेत होत अशी माहिती समोर आली आहे.

वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहीर शहासोबत त्याचा चालक राजरुपी राजेंद्र सिंग बिडावत (वय ३१ वर्षे) हा देखील सोबत होता. मिहीर कार चालवत क्रॉफर्ड मार्केट येथून मरीन ड्राइव्हहून वरळीसाठी पेडररोड मार्गे आला. नेहरू तारांगण येथील बसस्टॉपच्या विरूद्ध दिशेला हा अपघात झाला. कारमध्ये मिहीर शहा आणि चालक राजरुपी राजेंद्र सिंग बिडावत हे दोघ होते. अपघातानंतर मिहीरचा फोन बंद येत असून त्याचा शोध सुरू आहे.

दरम्यान, वरळी हिट अँड रन प्रकरणी वरळी पोलिसांनी मिहीर शहाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर चौकशीसाठी राजेंद्रसिंग बिडावत आणि मिहीरचे वडील राजेश शहा यांना ताब्यात घेतले आहे. वरळी पोलिसांनी याप्रकरणी कलम १०५, २८१, १२५ १, २८१, १२५ (ब), (ब), २३८, ३२४ (४) भारतीय न्याय संहिता सह कलम १८४,१३४ (अ), १३४ (ब), १८७ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद केला आहे. कार मिहीर शहाच्या नावाने असून मिहीर कारचा सेकंड ओनर आहे.

अपघातानंतर मिहीर वांद्रे कलानगर येथे गाडी सोडून पळून गेला. त्याने वडिलांना सकाळी फोन करून घटनेची माहिती दिली. त्याच्यानंतर त्यान फोन बंद केला. मिहीर दहावी पास असून कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतो. मिहीरची आई आणि बहीण घराला टाळे ठोकून फरार झाले आहेत. पोलिसांची चार पथक मिहीरचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhivtas Waterfall : पाचशे फुटांवरून झेपावणारा भिवतास वॉटर फॉल; निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच!

Tejaswini Pandit: 'आई...' एवढेच उच्चारले अन् तेजस्विनी पंडित ढसाढसा रडली…; हृदय पिळवटून टाकणारा क्षण, VIEDO

केवळ चपातीच नाही तर तुम्ही गव्हाच्या पीठापासून बनवू शकता 'हे' टेस्टी फूड्स

Rahul Gandhi : मतचोरी होऊ देणार नाही, राहुल गांधी आयोगावर कडाडले

Painganga River Flood: पैनगंगा नदीला पूर, सहस्रकुंड धबधब्याने घेतले रौद्ररूप; पूरामध्ये पूल गेला वाहून, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT