Uddhav Tahckeray- Sanjay Rathod Saam TV
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या खेळीने संजय राठोडांची अडचण वाढली, आगामी निवडणूक जड जाणार?

संजय राठोड यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघातून १९९९ आणि २००४ अशा सलग दोन टर्ममध्ये अपक्ष म्हणून विधानसभेवर निवडून गेले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्याच्या राजकारणात ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि शिंदे गट यांच्यातील रस्सीखेच सुरुच आहे. दोन्ही गट एकमेकांना शह देण्यासाठी निमित्त शोधत असतात. शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री संजय राठोड (Sanjay Raothod) यांना धक्का देण्यास ठाकरे गट सज्ज झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील संजय राठोड यांच्या मतदार संघातील माजी मंत्री संजय देशमुख यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

संजय राठोड यांचे निकटवर्तीय असलेले महंत यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर आज संजय देशमुख यांनी आज शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. (Latest News Update)

कोण आहेत संजय देशमुख?

संजय देशमुख हे माजी शिवसैनिक आहेत. ते यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघातून १९९९ आणि २००४ अशा सलग दोन टर्ममध्ये अपक्ष म्हणून विधानसभेवर निवडून गेले होते. त्यांच्यासोबत यवतमाळ जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

पक्षप्रवेशानंतर संजय देशमुख यांनी म्हटलं की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात करत आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत नक्की चमत्कार पाहायला मिळेल. ज्या पक्षाने मला मोठं केलं त्या पक्षाची परिस्थिती पाहता त्यांना मदत म्हणून मी हा निर्णय घेतला. हा निर्णय घेत असताना मी माझ्या आईला देखील विचारलं ज्या पक्षाने मोठे केलं त्यांच्यासोबत असणं गरजेचं आहे असं आई देखील म्हणाली. संजय राठोड यांनी गेल्या वीस वर्षात बंजारा समाजासाठी काही केलेलं नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईत धो धो पाऊस, अंधेरी सब वे पाण्याखाली

अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; दुध टँकरची ट्रकला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Mumbai Rains : मुंबईत पावसाचा धुमाकूळ, अंधेरी सबवे पाण्याखाली, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे जॅम|VIDEO

LIC AAO Recruitment: LIC मध्ये सरकारी नोकरीची संधी; पगार १६९००० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Oldest Water on Earth: कॅनडातील शास्त्रज्ञांनी चाखलं २०० कोटी वर्षांपेक्षा जुनं पाणी; शास्तज्ञांकडून पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळाबद्दल मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT