Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

BMC Election: 'तुम्ही गेले पंधरा वीस वर्ष महापालिकेवर दरोडा टाकला', शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार

'तुम्ही गेले पंधरा वीस वर्ष महापालिकेवर दरोडा टाकला', शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार

साम टिव्ही ब्युरो

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: दरोडा टाकणाऱ्यांनी चोरीची भाषा करणे हे त्यांच्या तोंडून शोभत नाही. गेले पंधरा वीस वर्ष महापालिकेवर दरोडा टाकला मुंबई महापालिकेची हजारो कोटी कुठे गेले याचा हिशोब या गाथा विचारणार आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून सरकारला लक्ष्य केलं होतं. यालाच प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे असं म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ''एसआयटी डिक्लेअर झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते दिशाभूल करण्याचं प्रयत्न करत आहेत. परंतु दिशाभूल होणार नाही दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि यातून उलटा चोर कोतवाल को दाटे असा विषय आहे.''

ते म्हणाले, ''कॅगच्या ताशेरांवर एसआयटी लावलेली आहे. ती निपक्षपाती पणे काम करेल. कुठलाही राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेऊन कुठलीही चौकशी होणार नाही. निपक्षपाती पणे जे केले त्याबाबतीत एसआयटी चौकशी करेल आणि या मुंबईकरांचा पैसा जो आहे, हा मुंबईकरांचा पैसा मुंबईकरांच्या तिजोरीत राहायला पाहिजे. तो कुणालाही इकडे तिकडे वळवता येणार नाही.''  (Latest Marathi News)

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ''जी-२० चं अध्यक्ष पद आपल्या देशाला मिळणं आणि अध्यक्ष प्रधानमंत्री मोदी होणे, ही आपल्या देशवाशियासाठी एक गौरव आणि अभिमानाची बाब आहे. हे कसं यांना (उद्धव ठाकरे यांना) कळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Suraksha Bima Yojana : मोदी सरकारची खास योजना; फक्त २० रुपयांत मिळतो २ लाख रुपयांचा विम्याचा लाभ, जाणून घ्या संपूर्ण माहिती

वर्किंग वूमनसाठी बेस्ट इयररिंग्स; वेस्टर्न टू एथनिक दोन्ही कपड्यांवर दिसतील भारी

Maharashtra News Live Update: तुकाराम मुंडे यांची धडक मोहीम! आता उल्हासनगरातही FDA ची कारवाई

Tharala Tar Mag: 'ठरलं तर मग'मध्ये सायलीच्या डोहाळ्यांसाठी अर्जुनची धावपळ; पण एका चुकीमुळे बाळावर ओढावणार मोठं संकट?

Bulldozer Action: थेट खासदाराच्या कार्यालयावरच बुलडोझर कारवाई; पाच मजली ऑफिस केलं जमीनदोस्त, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT