BMC Covid Scam Saam Tv
मुंबई/पुणे

BMC Covid Scam: कोविड घोटाळा प्रकरण: BMC मध्ये ईडीचं पथक दाखल, पालिका अधिकाऱ्यांची चौकशी सुरू

कोविड घोटाळा प्रकरण: BMC मध्ये ईडीचं पथक दाखल, पालिका अधिकाऱ्यांची चौकशी सुरू

Satish Kengar

BMC Covid Scam: मुंबई महापालिकेत आता ईडीची एंट्री झाली आहे. कोविड घोटाळ्या प्रकरणी ईडीचं पथक मुंबई महानारपालिकेच्या खरेदी मध्यवर्ती कार्यालयात दाखल झालं आहे. कालच्या छापेमारीनंतर ईडीचं पथक आज पालिका अधिकाऱ्यांची चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बीएमसी (BMC) कोविड घोटाळा प्रकरणी ईडीचं (ED) छापा सत्र सुरु आहे. यातच आज ईडी पालिकेच्या खरेदी मध्यवर्ती कार्यालयात दाखल झाली आहे. ईडीसोबत एसबीआयचे (SBI) अधिकारी देखील आहेत. या संपूर्ण प्रकरणात ऑक्सिजनचे टेंडर देताना घोटाळा झाल्याचं सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

याच विभागातून कोविड दरम्यान लागणाऱ्या औषधांची, उपकरणांची तसेच ऑक्सिजन खरेदी संदर्भातली संपूर्ण प्रक्रिया पार पडली. ज्यात घोटाळा झाल्याचा आरोप आहे. त्यासाठीच हे पथक येथे दाखल झालं आहे.

दरम्यान, मुंबईत काल म्हणजे 21 जून रोजी अंमलबजावणी संचालनालयाने जवळपास 15 ठिकाणी धाडी टाकल्या. कोरोना काळातील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली होती. काल सुरु झालेलं हे धाडसत्र आजही सुरु आहे.

आज मुंबई महापालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. बिरादार हे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. या धाडसत्रावरुन अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. राज्यातील सत्तासंघर्षात अधिकाऱ्यांना नाहक त्रास नको, अशी चर्चा अधिकारी वर्गात सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐरोलीत राहायचा, मुंबईतल्या बऱ्याच ठिकाणांची रेकी; दहशतवादी संघटनांच्या संपर्कातील तरुणाला ATS-पोलिसांनी ठोकल्या बेड्या

चतुरस्र अभिनेता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; चित्रपटसृष्टीवर शोककळा, ५ दशकांत ६०० हून अधिक चित्रपटांत केलं होतं काम

Maharashtra News Live Update: Mumbai: रायगडच्या खालापुरमध्ये लागल्या वाहनांच्या रांगा

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT