Uddhav Thackrey News Saamtv
मुंबई/पुणे

Matoshree bungalow News: उद्धव ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यात आढळला 'कोब्रा' जातीचा विषारी साप; कर्मचाऱ्यांची धावपळ

Cobra Found In Matoshree Bungalow Area: बंगल्याच्या पार्किंगमध्ये कोब्रा जागीचा विषारी नाग दिसला. त्यानंतर कर्मचाऱ्यांकडून तात्काळ सर्पमित्राला बोलावण्यात आले.

सुरज सावंत

Udhav Thackeray News: शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील बंगल्यात विषारी साप आढळल्याने एकच खळबळ उडाली. बंगल्याच्या आवारात पार्किंगमध्ये कोब्रा जातीचा विषारी साप आढळला. यानंतर तात्काळ सर्पमित्रांना बोलावून अखेर सापाला पकडण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानी विषारी साप आढळल्याने एकच गोंधळ उडाला. रविवारी २ वाजताच्या सुमारास बंगल्याच्या पार्किंगमध्ये कोब्रा जागीचा विषारी नाग दिसला. त्यानंतर कर्मचाऱ्यांकडून तात्काळ सर्पमित्राला बोलावण्यात आले.

मातोश्रीवरुन (Matoshree) वाईल्ड लाईफ ॲनिमल प्रोटेशन ॲन्ड रेस्क्यू असोशिएशनला फोन करुन साप आढळल्याची माहिती देण्यात आली त्यानंतर सर्पमित्र अतुल कांबळे हे मातोश्री निवासस्थानी गेले. हा साप 'कोब्रा' या विषारी जातीचा नाग असून त्याची लांबी अंदाजे ४ फूट होती.

हा साप रेस्क्यू करून त्याची माहिती ठाणे वनविभागाच्या कंट्रोल रूमला देण्यात आली. सापाला पकडून वनविभागाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे जंगलात सोडण्यात आले, अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान,याआधी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या निवासस्थानीही साप आढळल्याने गोंधळ उडाला होता. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हिंगोली राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद

Cancer Alert: आताच सावध व्हा! नकळत या गोष्टींमुळे वाढतोय कॅन्सरचा धोका, अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल

Who is Petal Gahlot: जगासमोर पाकच्या पंतप्रधानांचे तोंड बंद केलं, खडेबोल सुनावणाऱ्या पेटल गहलोत कोण आहेत?

Vastu Tips: शुभ कार्यापूर्वी नारळ का फोडतात? जाणून घ्या शास्त्र

Wardha Accident: कार डिव्हायडर तोडून दुसऱ्या बाजूला कंटेनरला धडकली, २ जणांचा मृत्यू, ३ जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT