Aditya Thackeray criticizes CM Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Aditya Thackeray: '५० खोके, ५० लोक; वऱ्हाड निघालं दाओसला...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री शिंदेवर टीकास्त्र

Gangappa Pujari

गिरीश कांबळे, मुंबई|ता. १५ जानेवारी २०२४

 Aditya Thackeray Press Conference:

15 जानेवारी ते 19 जानेवारीला दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत आणि 10 सदस्यीय शिष्टमंडळ सहभागी होणार आहेत. या दौऱ्यावरुन ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच हा दौरा आहे की सहल? असा खोचक सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणालेत आदित्य ठाकरे?

"घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांसोबत 50 लोकं डाओसला जात आहेत. 50 खोके तसं 50 लोकं. यासाठी परराष्ट्रमंत्री आणि केंद्रीय वित्त खातं यांची परवानगी लागते. 50 पैकी फक्त 10 लोकांची परवानगी मागितली आणि ती परवानगी केंद्राने दिली आहे. पण 50 लोकं जात आहेत, त्या लोकांची परवानगी मागितली आहे का?" असा सवाल आदित्य ठाकरे यांंनी उपस्थित केला.

गद्दारी केली तर थेट डाओस दौरा..

"तसेच या 50 जणांमध्ये मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, एक खासदार जात आहेत. त्यांचं तिथे काय काम आहे हे कळवलं नाहीये. आता एक माजी खासदार देखील आहेत. याआधी गद्दारी करणाऱ्यांना गुवाहाटी घेऊन गेले, आता गद्दारी केली तर थेट डाओसला घेऊन जात आहेत," असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वऱ्हाड निघाला डाओसला...

"वऱ्हाड निघालला लंडनला तसा हे वऱ्हाड निघाला डाओसला, तसा हा प्रकार आहे. ५ किंवा ६ लोकांऐवजी एवढे लोक कशाला चाललेत. मुख्यमंत्र्यांचे पीए ओएसडी चाललेत.दोन तीन दलालही घेवून चाललेच. सुटी व मजेसाठी चाललेत का? सही करायला एवढा लोक कशाला, बॅगा उचलायला, गाडीला धक्का मारायला चाललेत का?" असा खोचक सवालही आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

SCROLL FOR NEXT