Aaditya Thackeray Amit Thackeray booked in Shivaji Park protest case साम टीव्ही मराठी
मुंबई/पुणे

Thackeray : ठाकरे बंधूंवर गुन्हे दाखल; पोलिसांची मोठी कारवाई, मुंबईत राजकीय वातावरण तापले

Aaditya Thackeray latest news : शिवाजी पार्क परिसरात झालेल्या आंदोलनाप्रकरणी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे.

Namdeo Kumbhar

साक्षी यादव, मुंबई प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Aaditya Thackeray Amit Thackeray booked in Shivaji Park protest case : मुंबईत रविवारच्या आंदोलनाचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. शिवाजी पार्क परिसरातील आंदोलनावरून ठाकरे कुटुंबाच्या अडचणीत वाढ झाली आहे. अमित ठाकरे आणि आदित्‍य ठाकरे यांच्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

आंदोलकांना सोडवण्यासाठी घेतलेल्या भूमिकेनंतर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रविवार रोजी शिवाजी पार्क परिसरात झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. या आंदोलकांना सोडवण्यासाठी आणि त्यांच्या समर्थनासाठी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे थेट मैदानात उतरले होते. त्यांनी पोलिसांच्या कारवाईचा विरोध करत पोलिसांच्या गाड्यांवर धाव घेतली होती. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी कठोर भूमिका घेत या नेत्यांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

शिवाजी पार्क परिसरात रविवारी झालेल्या या आंदोलनादरम्यान पोलिसांनी तब्बल ३०० आंदोलकांना ताब्यात घेतले होते, ज्यांना नंतर पोलिसांनी सोडून दिले. मात्र, आता या सर्व आंदोलकांवरही गुन्हे दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया पोलिसांकडून सुरू करण्यात आली असल्याची माहिती स्पष्ट झाली आहे.

या आंदोलनादरम्यान परिस्थिती चांगलीच तापल्याचे पाहायला मिळाले. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांच्या सुटकेसाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे थेट मैदानात उतरले होते. सेना भवन परिसरात आदित्य ठाकरेंनी ठिय्या दिला होता, तर आंदोलकांच्या सुटकेसाठी हे दोन्ही नेते शिवाजी पार्क पोलीस ठाण्यातही पोहोचले होते. या संपूर्ण घडामोडींनंतर आता ठाकरे नेत्यांसह आंदोलकांवरही गुन्ह्यांचा बडगा उगारण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काँग्रेस खासदार डॉ. अंगोमचा बिमोल विरोधात भाजपचे आंदोलन

White Saree For Womens: महिलांसाठी पांढऱ्या रंगाच्या साड्यांचे सुंदर कलेक्शन, या 5 डिझाईन्स नवरात्रीसाठी बेस्ट

Congress Protest Live Update : "सर्वोच्च न्यायालयाला आंदोलनात ओढू नका!"; सूर्यकांत यांचा स्पष्ट इशारा

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अचानक टायर फुटला अन् क्षणात पेटला ट्रक, २ जणांचा होरपळून मृत्यू

UTI vs Diabetes : वारंवार लघवीला जावे लागतेय? युरिन इन्फेक्शन की डायबिटीज, कसे ओळखाल?

SCROLL FOR NEXT