Wardha Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Air hostes Killed in Powai : पवईत २३ वर्षीय एअर हॉस्टेसची हत्या, मित्र आणि बहिण घरात नसताना घडला प्रकार

Mumbai Crime News : रूपल ओगरे असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

मुंबईतील पवई परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पवईमध्ये २३ वर्षीय हवाई सुंदरीची म्हणजेच एअर हॉस्टेसची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत आहेत.

रूपल ओगरे असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मरोळ येथील राहत्या या एअर हॉस्टेसचा मृतदेह सापडला आहे. तरुणीची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. (Crime News)

रूपल ओगरे ही मुळची रायपूरची आहे. मरोळ येथील एनजी कॉम्पलेक्स येथे ती राहत होती. बहीण आणि तिच्या मित्रासोबत ती एकाच फ्लॅटमध्ये राहत होती. मात्र दोघेही सध्या गावी गेले होते. (Latest Marathi News)

रुपलचे घरचे तिला फोन करत होते, मात्र ती फोन उचलत नसल्याने घरच्यांना तिच्या मित्राला याबाबत माहिती दिली. त्यावेळी मित्र तिच्या घरी पोहोचला, तेव्हा दरवाजा ठोकूनही कुणीही दरवाजा उघडला नाही. दरवाजा तोडला त्यावेळी घटनेची माहिती समोर आली.  (Political News)

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पवई पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी झाले आणि पुढील तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिला शिक्षकाची वाट अडवली; दोघांनी मिळून कपाळावर गोळी झाडली, भरदिवसा रक्तरंजित थरार

Nitesh Rane: तपोवनातल्या वृक्षतोडीची चिंता करणारे बकरी ईदला गप्प का? राणेंचा सवाल, शिरसट म्हणाले...

मुंबई-गोवा महामार्गाचं काम कधीपर्यंत पूर्ण होणार? नव्या डेडलाइनची घोषणा

Paneer Roll: मुलांच्या डब्यासाठी बनवा पौष्टिक पनीर रोल; सोपी रेसिपी वाचा

Beed Politics: बीडमध्ये राजकारण तापले! अमरसिंह पंडितांच्या पीएवर हल्ला, पाहा थरारक सीसीटीव्ही VIDEO

SCROLL FOR NEXT