Gujarat Youth death in Mumbai saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News: गुजरातच्या तरुणाचा मुंबईत मृत्यू, गरबा खेळताना खाली कोसळला अन्...

Gujarat Youth death in Mumbai: गरबा खेळण्यासाठी गुजरातवरून मुंबईत आलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गरबा खेळताना तो अचानक खाली कोसळला आणि जागीच प्राण सोडले.

Priya More
  • मुंबईत गरबा खेळताना गुजरातच्या १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला

  • गोरेगावमधील सेजल रास उत्सवादरम्यान ही घटना घडली

  • गरबा खेळताना तरुण अचानक कोसळला आणि रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला

संजय गडदे, मुंबई

गुजरातमधून मुंबईत गरबा खेळण्यासाठी आलेल्या १९ वर्षीय तरुणाचा गरबा खेळताना मृत्यू झाला. जय हितेश चरला असे मृत तरुणाचे नाव असून तो गुजरातमधील अधोई गावचा रहिवासी होता. गोरेगाव पश्चिम येथील गोकुळ गणेश मैदानावर सुरू असलेल्या सेजल रास उत्सवादरम्यान सोमवारी रात्री ही घटना घडली. गरबा खेळताना जय खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूमुळे उत्सवाच्या शेवटच्या रात्रीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले.

गोरेगाव पश्चिम येथील एमराल्ड एसी डोम अर्थात गोकुळ गणेश मैदानावर ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान सेजल रास उत्सव २०२६ आयोजित करण्यात आला होता. श्री वागड विशा ओसवाल चोवीसी महाजन यांच्या वतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवादरम्यान जय चरला गरबा खेळत होता. त्याचवेळी तो अचानक खाली कोसळला.

जय गरबा खेळताना अचानक खाली कोसळल्याने घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला. त्याला तातडीने सीपीआर देण्यात आला. त्यानंतर रात्री सुमारे ११.१० ते ११.२० वाजण्याच्या दरम्यान त्याला गोरेगाव येथील प्रार्थना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, अशी माहिती रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. त्रिलोकी नाथ गुप्ता यांनी दिली.

जय चरलाला यापूर्वी हृदयाशी संबंधित समस्या असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत कुटुंबीयांनी अधिक माहिती दिलेली नसल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. गरबा खेळण्यासाठी गुजरातमधून मुंबईत आलेल्या तरुणाचा उत्सवादरम्यान मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर आयोजकांनी उत्सवाच्या शेवटच्या रात्रीचे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिल्लीतील हवाला ऑपरेटर आणि अन्य कंत्राटाचीही होणार चौकशी

Gold Rate Today : सुवर्णनगरीत सोने-चांदीचे दर घसरले; १ तोळा सोन्याचे दर किती? जाणून घ्या

Ramayana OTT : रणबीर कपूरचा 'रामायण' थिएटरनंतर 'ओटीटी'वर कुठे अन् कधी पाहता येणार? आहे मात्र १ अट

Wood Furniture Polishing Tips : घरातील या खास टीप्स वापरुन जुन्या लाकडी फर्निचर करा नव्यासारखे

Konkan Railway : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! सावंतवाडी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल; कुठे कुठे थांबणार? वाचा

SCROLL FOR NEXT