Oxidized Jhumka Designs : गरबा नाइटसाठी परफेक्ट! ऑक्सिडाइज्ड झुमक्यांचे ७ लेटेस्ट डिझाइन्स, घागरा-चोळीवर दिसतील खुलून

Shreya Maskar

नवरात्री

नवरात्रीत गरबा नाईटला खास लूक करा, त्यासाठी ऑक्सिडाइज्ड झुमके हा उत्तम पर्याय आहे. घागरा-चोळी, कुर्ती, इंडो-वेस्टर्न आउटफिट, साडी अशा विविध कपड्यांवर हे झुमके सुंदर दिसतात.

Navratri | pinterest

पारंपरिक ऑक्सिडाइज्ड झुमके

फुलांच्या नक्षीकामासह गोलाकार घुमट असलेले झुमके पारंपरिक गरबा लुकसाठी उत्तम आहेत. आरशांचे काम असलेला घागरा आणि ऑक्सिडाइज्ड नेकलेससोबत ते सुंदर दिसतात.

Traditional oxidized earrings | pinterest

घुंगरू डिझाइन झुमके

झुमक्यांच्या खालच्या बाजूला लहान घुंगरू असलेले डिझाइन गरबा लुकमध्ये आकर्षक दिसते. नृत्य करताना हलणारे घुंगरू झुमक्यांना खास पारंपरिक अंदाज देतात.

Bell design earrings | pinterest

चांदबाली ऑक्सिडाइज्ड झुमके

चंद्रकोरीच्या आकारासोबत खाली झुमका असलेले हे डिझाइन पारंपरिक आणि मॉडर्न लुकचा सुंदर मेळ साधते.

Chandbali Oxidized Earrings | pinterest

फ्लोरल झुमके

फ्लोरल हा आजकालचा ट्रेंड आहे. नाजूक फुलांच्या नक्षीचे हलके झुमके रात्रभर गरबा खेळताना आरामदायी पर्याय ठरतात.

Floral earrings | pinterest

मिरर वर्क झुमके

आरशांचे छोटे तुकडे असलेले झुमके गुजराती गरबा फॅशनसोबत छान दिसतात. यामुळे एक इंडो वेस्टर्न लूक येतो.

Mirror work earrings | pinterest

मोराच्या नक्षीचे झुमके

मोराच्या आकारातील नक्षीकाम असलेले झुमके पारंपरिक दागिन्यांमध्ये उठून दिसतात. रंगीत धाग्यांचे काम किंवा भरतकाम असलेल्या पोशाखांवर हे डिझाइन विशेष खुलून दिसते.

Peacock embroidered earrings | pinterest

स्टेटमेंट झुमके

मोठे आणि उठावदार झुमके तुमच्या गरबा लुकचा मुख्य आकर्षण ठरू शकतात. विशेषतः साध्या कुर्ती किंवा एकाच रंगाच्या घागरा चोळीसोबत ते छान दिसतात.

Statement Earrings | pinterest

NEXT : आईच्या साडीपासून बनवा गुजराती स्टाइल घागरा; नवरात्रीत तुमचा लूक दिसेल एकदम खास, वाचा ड्रेपिंगची सोपी पद्धत

Saree To Ghagra | AI PHOTO
येथे क्लिक करा...