Shreya Maskar
नवरात्रीमध्ये गरबा आणि दांडियासाठी पारंपरिक लूकसोबत काहीतरी हटके ट्राय करायचे असेल, तर साडीपासून स्कर्ट किंवा घागरा ड्रेप करा. बाजारातील महागड्या घागरा चोळीपेक्षा सुंदर लूक येईल.
साडी व्यवस्थित बसण्यासाठी कमरेला फिट होणारा पेटीकोट किंवा इनर स्कर्ट घाला. त्यामुळे साडीला योग्य आधार मिळेल आणि ती सरकणार नाही.
साडीचे एक टोक कमरेला खोचून घ्या. त्यानंतर साडी कमरेभोवती गुंडाळत जा. स्कर्टला घेरदार लूक हवा असल्यास साडीचा कापड समान भागात वाटा.
साडीच्या उरलेल्या कापडाच्या समान घड्या घाला. या घड्या कमरेजवळ नीट खोचून सेफ्टी पिनने सुरक्षित करा, जेणेकरून स्कर्टचा आकार सुंदर दिसेल.
साडीचा पदर खांद्यावरून दुपट्ट्यासारखा घ्या किंवा एका बाजूला प्लीट्स करून पिन लावा. यामुळे स्कर्टला पारंपरिक आणि फ्युजन लूक मिळेल.
शेवटी ज्वेलरी घालून लूक पूर्ण करा. ऑक्सिडाइज्ड नेकलेस, मोठे झुमके, बांगड्या, कमरपट्टा घाला.
स्कर्टला अधिक घेर हवा असल्यास साडीचा पदर आणि उरलेले कापड योग्य प्रकारे विभागा. साडी आणि ब्लाउजचे रंग कॉन्ट्रास्टमध्ये निवडा. कंबरेवर कमरपट्टा घातल्यास ड्रेप अधिक उठून दिसेल. सर्व घड्या पिन्सने व्यवस्थित सुरक्षित करा.
तुम्हाला जर साडीपासून घागरा करायचा असेल तर बांधणी साडी, सिल्क साडी आणि जॉर्जेट साडी निवडा. या साड्या सांभाळायला सोप्या जातात.