railway station saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Railway Stations : मुंबईतील 15 स्थानकांचा कायापालट होणार, काय-काय बदल होणार?

Indian Railway : अमृत ​​काळात विकसित झालेल्या छोट्या रेल्वे स्थानकांना ‘अमृत भारत’ असे नाव देण्यात आले आहे.

प्रविण वाकचौरे

Mumbai News : मुंबईतील १५ रेल्वे स्थानकांचा लवकरच कायापालट होणार आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत मुंबईतील काही स्थानकांचा विकास होणार आहे.

यामध्ये भायखळा, चिंचपोकळी, परेल, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, विक्रोळी, कंजूरमार्ग, मुंब्रा, दिवा, शहाड, टिटवाळा, वडाळा रोड, सँडहस्ट रोड या मुंबईतील स्थानकांचा समावेश आहे.

रेल्वे स्थानकावर सरकता जिना, प्रतीक्षा कक्ष, स्वच्छता गृह, प्रकाश दिवे, रेल्वे फलक, दिशादर्शक, वाहनतळ, या सारख्या सुविधा वाढवल्या जाणार आहेत. (Latest Marathi News)

अमृत ​​भारत योजना काय आहे?

अमृत ​​काळात विकसित झालेल्या छोट्या रेल्वे स्थानकांना ‘अमृत भारत’ असे नाव देण्यात आले आहे. अमृत भारत स्टेशन योजनेत ही दीर्घकालीन दृष्टीकोनातून तयार करण्यात आली आहे. मोठ्या स्थानकांप्रमाणेच छोट्या स्थानकांची पुढील ५० वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन पुनर्बांधणी केली जाईल. जिथे प्रवाशांना उच्च दर्जाच्या सुविधा मिळतील.

रेल्वे मंत्रालयाच्या ‘अमृत भारत स्थानक योजने’अंतर्गत देशभरातील १२७५ रेल्वे स्थानकाच्या पूर्णविकास करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातील १२३ स्थानकाचा समावेश आहे. (Maharashtra News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आज कामात अडथळे येतील; वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटे यांची अँजिओग्राफी केली जाणार

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT