Ulhasnagar Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Ulhasnagar News : उल्हासनगरात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची मोठी कारवाई; ७५ किलो गांजासह ४८०० कोडीन सिरपचा साठा जप्त

Ulhasnagar Crime News : मुंबईच्या नार्कोटिक्स ब्युरोने उल्हासनगरमध्ये मोठी कारवाई करत तब्बल ७५ किलो गांजा जप्त केलाय. याशिवाय आरोपींकडून ४८०० कोडीन सिरपच्या बाटल्या देखील जप्त करण्यात आल्या आहेत.

अजय दुधाने

मुंबईच्या नार्कोटिक्स ब्युरोने उल्हासनगरमध्ये मोठी कारवाई करत तब्बल ७५ किलो गांजा जप्त केलाय. याशिवाय आरोपींकडून ४८०० कोडीन सिरपच्या बाटल्या देखील जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

उल्हासनगरमधील Ulhasnagar News) एक सिंडिकेट आंतरराज्य ड्रग्स रॅकेट चालवत असल्याची माहिती मुंबईच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला मिळाली होती. यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने पाळत ठेवून उल्हासनगरमधील एका कुरिअरच्या ऑफिसमध्ये धाड टाकली.

यामध्ये कोडीन सिरपच्या ४८०० बाटल्या जप्त करण्यात आल्या. तसंच एकाला अटक करण्यात आली. यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी परिसरात (Bhiwandi News) धाड टाकत ५ जणांना एका वाहनासह पकडण्यात आलं.

या वाहनात ७५ किलो गांजा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला सापडला. तसंच या ५ जणांकडून १ लाख १७ हजार ८६० रुपये देखील जप्त करण्यात आले. या सगळ्यांना एनडीपीएस कायद्यान्वये अटक करण्यात आली.

सर्वांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशी सुरू आहे. या सगळ्यामागे आंतरराज्य टोळी सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या सहाही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा केला जातोय.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

Kalyan Toilet Protest : १२ हजार जणांच्या लोकवस्तीत एकच शौचालय, नागरिकांचं थेट आयुक्तांच्या दालनाबाहेर 'टॉयलेट' आंदोलन

SCROLL FOR NEXT