Mumbai Nalasopara Birthday Cake Food Poisoning AI Image
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईत खळबळ! वाढदिवसाचा केक खाल्ल्याने ११ जणांना विषबाधा; ७ अल्पवयीन मुलांचा समावेश

Nalasopara Birthday Tragedy : नालासोपाऱ्यात वाढदिवसाचा केक खाल्ल्यानंतर ७ अल्पवयीन मुलांसह ४ महिलांना उलट्या, मळमळ आणि त्रास झाला. ११ जणांवर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

Alisha Khedekar

  • नालासोपाऱ्यात धक्कादायक घटना घडली

  • वाढदिवसाचा केक खाल्ल्यानंतर ७ अल्पवयीन मुले आणि ४ महिलांना त्रास

  • एकूण ११ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल

  • केकमध्ये मृत पाल आढळल्याचा दावा

मनोज तांबे, मुंबई

नालासोपाऱ्यात धक्कादायक घटना घडली आहे. नालासोपाऱ्यात पूर्वेकडील निळकंठेश्वर इमारतीत वाढदिवसाचा केक खाल्ल्यानंतर सात अल्पवयीन मुलांसह चार महिलांना अन्नातून विषबाधा झाली. ही घटना शनिवारी रात्री समोर आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विषबाधेची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नसून संबंधित केकची तपासणी करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निळकंठेश्वर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीचा शनिवारी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त सायंकाळी कुटुंबीय आणि शेजारी राहणारी काही लहान मुले घरी जमली होती. यावेळी वाढदिवसाचा केक कापण्यात आला. उपस्थितांनी केक खाल्ल्यानंतर काही वेळातच काही जणांना अचानक त्रास जाणवू लागला.

सात अल्पवयीन मुले आणि चार महिलांना उलट्या, मळमळ तसेच अन्य त्रास सुरू झाल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने नालासोपारा पूर्वेकडील टाकीपाडा येथील विजयलक्ष्मी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात सर्व ११ जणांवर उपचार करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, केक खाल्ल्यानंतर काही मुलांनी त्यामध्ये मृत पाल आढळल्याचे सांगितल्याचा दावा करण्यात येत आहे. या दाव्यामुळे घटनेचे गांभीर्य आणखी वाढले आहे. मात्र, केकमध्ये नेमके काय आढळले होते, याची अद्याप अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. विषबाधा केवळ केकमुळेच झाली का, केकमध्ये कोणता पदार्थ आढळला किंवा अन्य कोणत्या कारणामुळे सर्वांना त्रास झाला, याचा तपास आता केला जाणार आहे. संबंधित केकचा नमुना तपासणीसाठी पाठवण्यात येण्याची शक्यता असून, अहवाल आल्यानंतर विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होईल. घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली असून, अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. अधिकृत तपासणी अहवालानंतरच या घटनेमागचे खरे कारण समोर येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT