saam tv
मुंबई/पुणे

Congress-Vanchit Alliance: काँग्रेस वंचित युती, वर्षा गायकवाड नाराज? गायकवाडांनी नाराजीनाट्यावर सोडलं मौन

Congress–Vanchit Alliance: 1999 नंतर पहिल्यांदाच काँग्रेस आणि वंचितची आघाडी झालीय. मात्र या आघाडीमुळे काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य रंगल्याची चर्चा आहे. या नाराजीनाट्याचं नेमकं कारण काय? आणि त्यावर काँग्रेसनं कसा पडदा टाकलाय. पाहूयात यावरचा खास रिपोर्ट.

Bharat Mohalkar

  • 1999 नंतर पहिल्यांदाच काँग्रेस-वंचित युती जाहीर

  • युतीमुळे काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची चर्चा

  • वर्षा गायकवाड यांनी नाराजीनाट्यावर मौन सोडलंय

अनेक दिवसांच्या चर्चांनंतर मुंबई महापालिकेसाठी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती जाहीर झाली. मात्र युतीच्या घोषणेवेळी वर्षा गायकवाडांच्या गैरहजेरीनं काँग्रेसमधील नाराजीनाट्याच्या चर्चांना उधाण आलं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्या मुद्द्यांमुळे वर्षा गायकवाड नाराज आहेत? पाहूयात.

प्रदेश काँग्रेसचा मुंबई काँग्रेसमध्ये वाढता हस्तक्षेप

वंचितला मुंबईतील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 10 जागा

वंचितला ताकदीपेक्षा जास्त जागा

काँग्रेसचा पारंपरिक राखीव वॉर्ड वंचितच्या नावे

वंचितमुळे काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य रंगल्याच्या चर्चांना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी दुजोरा दिला असतानाच आपण नाराज नसल्याचं स्पष्ट करत वंचितसोबतच्या युतीचं श्रेय वर्षा गायकवाडांनी स्वतःकडेच घेतलंय. वर्षा गायकवाडांनी नाराजीच्या चर्चा फेटाळून लावल्या असल्या तरी काँग्रेसची ताकद असलेल्या कोणत्या जागा वंचितला सोडण्यात आल्या आहेत.पाहूयात.

मुंबईतील दलित, मुस्लीम आणि अल्पसंख्याक जागांवर काँग्रेसची ताकद

धारावी, कुर्ला, मानखुर्द, चेंबूरमधील ताकद असलेल्या 42 जागा वंचितला

वायव्य मुंबईतही वंचितला जागा सोडण्यात आल्या

खरंतर ठाकरे बंधूंच्या युतीनंतर काँग्रेसनं आधी स्वबळाचा नारा दिला होता. त्यानंतर काँग्रेसनं महादेव जानकर यांची रासप आणि वंचितसोबत आघाडी केलीय. यात रासप 10 जागा , वंचित 62 जागा आणि काँग्रेस 155 जागा लढवणार आहे.

रासपला 10 जागा

वंचितला 62 जागा

काँग्रेस - 155 जागा

आता काँग्रेस आणि वंचितच्या युतीनंतर सुरु झालेल्या नाराजीनाट्यावर काँग्रेसनं पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय खरा... मात्र इच्छुकांच्या आशेवर पाणी फेरल्यामुळे वंचित आणि काँग्रेसच कार्यकर्त्यांचं मनोमिलन होणार का? आणि मुंबईत रया गेलेल्या काँग्रेस आणि वंचितला एकमेकांच्या मतांमुळे नवसंजीवनी मिळणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KDMC Mayor: मोठी बातमी! कल्याण-डोंबिवलीत महापौर शिंदेसेनेचा, मनसेने दिला पाठिंबा

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंचे राजेंद्र राठोड यांचा जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा

Sanjay Raut: शिंदेंना दिल्लीत जाऊन गुजराती नेत्यांच्या पायाशी बसावं लागतं, संजय राऊत यांची खरपूस टीका

Mumbai Bellasis Bridge : मुंबईकरांसाठी खुशखबर! मुंबई सेंट्रलमधील 'तो' ब्रिज सोमवारी होणार खुला, वाहतूककोंडी होणार कमी

Nagarsevak Salary: तुमच्या शहरातील नगरसेवकांचा पगार किती असतो?

SCROLL FOR NEXT