Weather Update:  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Monsoon : मुंबईत मान्सून कधी दाखल होणार? हवामान विभागाने सांगितली तारीख

Mumbai Weather Update: हवामान विभागाने १५ जूनच्या आसपास मुंबईत मान्सून आगमनाची शक्यता वर्तवली आहे. उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Namdeo Kumbhar

Mumbai Monsoon, IMD Weather Forecast : जून महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेला असला तरी मुंबईतील उकाडा अद्याप कमी झालेला नाही. मान्सून लांबल्यामुळे मुंबईकर सध्या कडक उष्णतेचा सामना करत आहेत. मात्र, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, १५ जूनच्या आसपास मुंबईत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे, पण कोरड्या वाऱ्यामुळे मान्सूनचा प्रवास रखडल्याचे सांगितले जात आहे.

रात्रीच्या तापमानात वाढ

पाऊस पडत नसल्याने मुंबईतील तापमानाचा पारा चांगलाच चढलेला पाहायला मिळत आहे. दिवसभराच्या कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले असतानाच, आता रात्रीच्या तापमानातही कमालीची वाढ झाली आहे. मुंबईत रात्रीचे तापमान ३० अंश सेल्सिअसवर पोहोचल्याची नोंद झाली आहे.

नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत

दिवसभराच्या तीव्र उष्णतेनंतर रात्रीच्या वेळीही नागरिकांना उकाड्यापासून कोणताही दिलासा मिळत नाही. त्यामुळे वाढत्या उष्णतेने हैराण झालेले मुंबईकर आता चातकासारखी पावसाची वाट पाहत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, १५ जूनपर्यंत मुंबईकरांना पावसासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

मुंबईत मान्सून कधी पोहोचतो?

मुंबईत मान्सूनच्या आगमनाची सामान्य तारीख (Normal Date) १० ते ११ जून मानली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांतील आकडेवारी पाहता मान्सूनच्या वेळेत मोठी अनिश्चितता दिसून आली आहे. गेल्या वर्षी मान्सूनने सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. नेहमीपेक्षा तब्बल १२ दिवस आधी, म्हणजेच २६ मे २०२५ रोजीच मान्सून मुंबईत दाखल झाला होता. २०२४ मध्ये मान्सून आपल्या नेहमीच्या वेळेच्या आसपास, म्हणजेच ९ जून २०२४ रोजी मुंबईत दाखल झाला होता. तर २०२३ चा मान्सून मात्र खूपच लांबला होता. सन २००१ नंतरचा हा सर्वात उशिरा आलेला मान्सून ठरला होता, २०२३ मध्ये मान्सून २५ जून २०२३ रोजी मुंबईत पोहोचला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Prostitution Racket: मराठी अभिनेत्रीचा एका रात्रीसाठी २ लाखात सौदा; मुंबईतील हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वेला मिळणार गती; मुख्यमंत्री स्तरावर हालचालींना वेग

Maharashtra News Live Update: Latur: वेल्डिंग करताना कंटेनरला भीषण आग, लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

Wednesday Horoscope : पैसा मिळणार, ५ राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

आमदाराचा तडकाफडकी राजीनामा; १११ आमदार असलेल्या पक्षात खळबळ

SCROLL FOR NEXT