Mumbai Monorail News Saam Tv News
मुंबई/पुणे

Monorail: मुंबईकरांना दिलासा! मोनोरेलला १० नवीन डबे, दर ६ मिनिटांनी धावणार गाडी

Mumbai Monorail News: मुंबई मोनोरेलला १० नवीन डबे मिळणार; प्रवास दर ६ मिनिटांनी होणार. मेट्रो मार्गांशी जोडणी होणार असून प्रवासी संख्येत वाढ अपेक्षित, एमएमआरडीएचा मोठा निर्णय.

Bhagyashree Kamble

चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या मोनोरेल मार्गावर प्रवासीसंख्या वाढवून तो आर्थिक तोट्यातून सावरण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) विविध उपाययोजना राबवत आहे. याच पार्श्वभूमीवर मोनोरेल सेवेत १० स्वदेशी बनावटीचे नवीन डबे समाविष्ट करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.

सध्या मोनोरेल दर १५ ते ३० मिनिटांच्या अंतराने धावत असताना, नव्या डब्यांच्या समावेशामुळे ही गाडी दर ६ मिनिटांनी धावू शकेल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. यामुळे प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या १० पैकी ७ गाड्या आधीच मुंबईत दाखल झाल्या असून, बाकीच्या ३ गाड्याही लवकरच दाखल होतील. हा संपूर्ण ताफा डिसेंबर २०२५ पर्यंत सेवेत दाखल होईल.

चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक मोनोरेल मार्ग हा फक्त मुंबईचाच नव्हे, तर संपूर्ण देशातील एकमेव मोनोरेल सेवा आहे. या प्रकल्पाची उभारणी दोन टप्प्यात करण्यात आली. पहिला टप्पा चेंबूर ते वडाळा आणि दुसरा टप्पा वडाळा ते संत गाडगे महाराज चौक. पहिला टप्पा ४ फेब्रुवारी २०१४ रोजी सुरू झाला तर दुसरा टप्पा फेब्रुवारी २०१९ मध्ये पूर्ण झाला.

मात्र, सेवा सुरू झाल्यानंतर अपेक्षित प्रवासी प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हा प्रकल्प आर्थिक तोट्यात गेला. अनेकदा या प्रकल्पाकडे 'पांढऱ्या हत्ती'प्रमाणे अपयशी योजनाकडे पाहिले गेले. मोठ्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न अत्यल्प असल्याने एमएमआरडीएने या प्रकल्पाला चालना देण्यासाठी नवे पावले उचलली आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून, मोनोरेल मार्गिकेला मेट्रो मार्गांशी जोडण्याची योजना आखण्यात आली आहे. यामध्ये मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे) आणि मेट्रो २ ब (अंधेरी पश्चिम ते मंडाले) या मार्गांसोबत समन्वय साधला जाईल. या योजनेमुळे मोनोरेलचा उपयोग अधिक प्रवाशांना करता येईल आणि प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ होईल, असा विश्वास एमएमआरडीएने व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिर्डीत झाडावर अवतरले साई? साईंच्या दर्शनासाठी उसळली गर्दी

स्मृती मंधाना-पलाशचं लग्न कुणामुळं पुढं ढकललं? संगीत सोहळ्याच्या रात्री काय घडलं? नवरदेवाच्या आईनं खरं कारण सांगितलं

Car Accident: भरधाव कारवरचा कंट्रोल सुटला, भीषण अपघातात IAS अधिकाऱ्यासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू

कराडप्रेम धनुभाऊंना भोवणार? मुंडेंना पक्षातून काढा, सुळेंचा हल्लाबोल

Maharashtra Live News Update: निर्मला गावित अपघात प्रकरणात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT