Mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

Customer Alert : सावधान! D-Mart मध्ये महिलांना हेरायचा अन् सोनं-पैशावर डल्ला मारायचा, पोलिसांनी सीरियल स्नॅचर’च्या मुसक्या आवळल्या

Mumbai News : मुंबईतील D-Mart मध्ये महिला ग्राहकांकडून पर्स, रोख रक्कम आणि ATM कार्ड चोरी करणारा ठग पोलिसांच्या ताब्यात. आरोपी बपी रतन भट्टाचार्य हा हॅबिच्युअल ऑफेंडर असून, १० पेक्षा अधिक चोरी प्रकरणांत सहभागी असल्याचे उघड झाले आहे.

Alisha Khedekar

मुंबईतील D-Mart मध्ये महिला ग्राहकांच्या पर्स चोरी करणारा ठग पोलिसांच्या ताब्यात

आरोपी बपी रतन भट्टाचार्य याने १० हून अधिक ठिकाणी अशाच चोऱ्या केल्याची कबुली दिली

CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी मीरारोड येथून अटक केली

महिलांनी खरेदीदरम्यान सावध राहावे असा पोलिसांचा इशारा

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

तुम्ही देखील D-Mart सारख्या भल्या मोठ्या सुपरमार्केट्मध्ये जात असाल तर सावधान! तुमच्या मौल्यवान वस्तूंची चोरी तर होत नाही ना याकडे लक्ष द्या. कारण मुंबईतील एका d'mart मध्ये महिला ग्राहकांना लक्ष्य करून त्यांचं मौल्यवान वस्तूंची चोरी करणाऱ्या एका ठगाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. MHB पोलिसांनी या आरोपीची ओळख बपी रतन भट्टाचार्य (53) अशी जाहीर केली आहे. तो गर्दीचा गैरफायदा घेत शॉपिंग ट्रोलीमध्ये ठेवलेल्या पर्स, रोख रक्कम, ATM कार्ड्स आणि कागदपत्रे चोरत असल्याचे उघड झाले आहे.

भट्टाचार्यला शनिवारी मीरारोड येथून अटक करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हा हॅबिच्युअल ऑफेंडर असून मुंबईतील विविध D-Mart शाखांमधील १० पेक्षा अधिक चोरीच्या घटनांमध्ये त्याचा सहभाग आढळला आहे. सध्या आरोपी एम एच बी कॉलनी पोलिसांच्या ताब्यात असून आरोपीने अशा प्रकारे अजून कुठे सूर्या केल्या आहेत किंवा इतर काही गुन्हे केले आहेत का? याबाबतचा तपास पोलीस करत आहेत.

अलीकडील प्रकरणात, दहिसर पश्चिम येथील एका महिलेची D-Mart कंदरपाडा येथे खरेदीदरम्यान पर्स चोरी झाली होती. त्यानंतर काही मिनिटांतच तिच्या पतीच्या खात्यातून २०,००० रुपयांची रक्कम चोरीच्या ATM कार्डद्वारे काढण्यात आली. CCTV फुटेज आणि तांत्रिक तपासावरून आरोपीची हालचाल शोधून काढत DCP संदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखालील तपास पथकाने त्याला अटक केली.

तपासादरम्यान भट्टाचार्यने अशाच प्रकारे केलेल्या अनेक चोरींची कबुली दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, मुंबई परिसरात त्याच्यावर १० हून अधिक गुन्हे नोंद आहेत, आणि सुपरमार्केटमध्ये चोरीची तक्रार आली की सर्वात आधी त्याच्यावर संशय घेतला जातो. आरोपीवर BNS आणि IT Act अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले असून, इतर चोरीच्या घटनांचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Masala Papad Recipe: हॉटेलस्टाईल मसाला पापड घरी कसा बनवायचा?

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

Pune Politics : अमोल कोल्हे यांना मोठा धक्का; जवळच्या कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश, पुण्यातील समीकरण बदलणार?

नाशिकमधील नामांकित ज्वेलरी दुकानात चोरी, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

PM Kisan Yojana: महत्त्वाची बातमी! या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचा पुढचा हप्ता; कारण काय?

SCROLL FOR NEXT