Tapovan School Fines Student Rs 50 During Paryushan Mira Bhayandar News AI Image
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईतील शाळेत धक्कादायक प्रकार! डब्ब्यात मेथीची भाजी आणल्याने आकारला ५० रुपयांचा दंड, नेमकं प्रकरण काय?

Mumbai Mira Bhayandar School News : पर्यूषण काळात डब्यात मेथीची भाजी आणल्याबद्दल विद्यार्थ्याकडून ५० रुपये दंड आकारल्याचा आरोप. मनसेच्या तक्रारीनंतर तपोवन विद्यालयाला महापालिकेची कारणे दाखवा नोटीस.

Alisha Khedekar

  • तपोवन शाळेत धक्कादायक प्रकार

  • पर्यूषण काळात विद्यार्थ्यांच्या डब्यातील मेथीच्या भाजीवर निर्बंध

  • मेथीची भाजी डब्यात आणल्याबद्दल एका विद्यार्थ्याकडून ५० रुपये दंड घेतले

  • तपोवन शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली

आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन स्क्वेअर शाळेने पर्यूषण काळात विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा, लसूण यांसह काही खाद्यपदार्थ आणण्यास बंदी घातल्याचे प्रकरण चर्चेत असतानाच भाईंदरमधील तपोवन विद्यालयातही अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. पर्यूषण काळात डब्यात मेथीची भाजी आणल्याच्या कारणावरून एका विद्यार्थ्याकडून ५० रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केल्यानंतर मिरा-भाईंदर महापालिकेच्या शिक्षण विभागाने शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पर्यूषण काळात तपोवन विद्यालयाने विद्यार्थ्यांना डब्यात मांसाहारी पदार्थांसह कांदा, लसूण, बीट आदी खाद्यपदार्थ आणण्यास मनाई केली होती. शाळेने या संदर्भात विद्यार्थ्यांना काही नियमही सांगितले होते. मात्र, एका विद्यार्थ्याने डब्यात मेथीची भाजी आणल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर शाळेने संबंधित विद्यार्थ्याकडून ५० रुपये दंड घेतल्याचे समोर आले आहे.

इतकेच नव्हे, तर विद्यार्थ्याच्या डब्यातील खाद्यपदार्थाबाबत आक्षेप घेतल्यानंतर त्याला कॅन्टीनमधून दुसरा खाद्यपदार्थ देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मनसेने याबाबत आक्षेप नोंदवत मिरा-भाईंदर महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची दखल घेत शिक्षण विभागाने तपोवन विद्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारे दंड आकारण्याचा निर्णय कोणत्या नियमांच्या आधारे घेण्यात आला, तसेच पर्यूषण काळातील खाद्यपदार्थांवरील निर्बंधांसंदर्भात शाळेने कोणते निर्देश दिले होते, याबाबत प्रशासनाने स्पष्टीकरण मागितले आहे. दरम्यान, शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आहारासंदर्भात धार्मिक किंवा सांस्कृतिक नियम लागू करण्याचा अधिकार आणि त्याची मर्यादा यावरून हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकरणात शिक्षण विभागाकडून शाळेच्या स्पष्टीकरणानंतर पुढील कारवाई केली जाते का, याकडे आता पालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुरतहून परतलेल्या आमदाराचं राम नाम सत्य होणार होतं; मंत्री संजय शिरसाटांचा खळबळजनक दावा, कुणाचा होता आमदाराला मारण्याचा प्लॅन?

Maharashtra News Live Update: सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरेविरुद्ध मोहिते-पाटील सामना रंगला

शिक्षकांसाठी गुड न्यूज! सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला दणका; पगारवाढीचा मार्ग मोकळा

राज्यातील ६ जिल्ह्यांत होणार नवीन अपर तहसीलदार कार्यालये; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, वाचा संपूर्ण यादी

Bank Holiday : उद्या बँकेत जाण्याआधी ही बातमी वाचा! २४ नोव्हेंबरला अनेक शहरांत बँका बंद

SCROLL FOR NEXT