Mhada Lottery 2024 Saam Tv
मुंबई/पुणे

Mhada Houses : म्हाडाच्या एका फ्लॅटची किंमत पाहून मुंबईकरांचे डोळे गरागरा फिरले; इतके महागडे घर परवडणार कसे?

Satish Daud

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईसारख्या मेट्रो शहरात आपलं हक्काचं घर असावं, अशी सर्वसामान्यांची इच्छा असते. मात्र, हा खर्च अनेकांना परवडणारा नसतो. यासाठी सर्वसामान्यांच्या नजरा म्हाडा तसेच सिडकोच्या लॉटरीकडे असतात. सर्वसामान्यांसाठी स्वस्तात घरे उपलब्ध करून देणे ही म्हाडाची ओळख आहे. परंतु या ओळखीचा म्हाडाला विसर पडतोय का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

त्यामागचं कारणही तसंच आहे. मुंबई मंडळाकडून (Mumbai News) नुकतीच अल्प उत्पन्न गटासाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये वरळीतील सस्मिरा येथील ५५० चौरस फूटाचा फ्लॅटची किंमत तब्बल २ कोटी ६२ लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

ही किंमत पाहून अल्प उत्पन्न गटातील घर घेणाऱ्यांचे डोळे गरागरा फिरले आहेत. विशेष बाब म्हणजे, विजेत्याला या किमती सोबतच सेवाशुल्क आणि मालमत्ता कर देखील भरावा लागणार आहे. त्यामुळे या घराच्या किमतीत अधिक भर पडणार आहे.

वार्षिक उत्पन्न ९ लाख रुपये असणाऱ्या नागरिकांसाठी हे घर उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, बँक यावर इतके लोन देईल का हा प्रश्न देखील आता उभा राहिला आहे. म्हाडाच्या (Mhada Houses) सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी सर्वात कमी किमतीचा फ्लॅट मानखुर्द पीएमजीपी कॉलनी येथे आहे.

या फ्लॅटची किंमत २९ लाख ३७ हजार रुपये आहे. तर लॉटरीतील उच्च उत्पन्न गटासाठीचा सर्वात महागडा फ्लॅट ७ कोटी ५७ लाख रुपयांचा असून हा फ्लॅट ताडदेवच्या क्रिसेंट टॉवरमध्ये आहे. दरम्यान, एवढा महागडा फ्लॅट असून आमचे दर बाजारभावापेक्षाही कमीच आहेत, असं म्हाडाचं म्हणणं आहे.

खासगी विकासकांकडून म्हाडाला गृहसाठ्यामध्ये मिळालेल्या घराच्या किमती कोट्यवधी रुपयांमध्ये असल्या तरी ही घरे मोक्याच्या ठिकाणी असून त्यांचे दर बाजारभावापेक्षा नक्कीच कमी आहेत, असा दावा म्हाडातर्फे करण्यात आला आहे.

दरम्यान, म्हाडातर्फे गोरेगाव पश्चिम, अॅण्टॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड, दादर, लोअर परळ यांसह विविध भागातील गृहनिर्माण प्रकल्पांमधील 2030 घरांच्या विक्रीचा शुभारंभ आज करण्यात आला. सोडत काढण्यासाठी म्हाडाने घाई केल्याने अर्जदारांमध्ये नाराजीचा सूर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: बदामाची पावडर दुधात टाका अन् मिळतील आरोग्यदायी फायदे

Maharashtra News Live Updates: आमदार भारती लवेकर समर्थनार्थ कार्यकर्त्यांची सोशल माध्यमातून पोस्टरबाजी

VIDEO : स्वार्थासाठी झालेल्या 'आघाडी' बिघाडी होणारच; एकनाथ शिंदेची मविआतील वादावर टीका !

Tasgaon Vidhan Sabha : तासगावमध्ये होणार घड्याळ- तुतारीत काट्याची लढत; भाजपचे नेते घड्याळ घेऊन उतरणार मैदानात

Health Tips: टोमॅटो आणि काकडी एकत्र खाताय? त्या आधी हे वाचा...

SCROLL FOR NEXT