नायगाव बीडीडीतील ८६४ घरांचे वाटप लवकरच
आचारसंहिता संपताच चावी वाटप कार्यक्रम होणार
पाच पुनर्वसित इमारती घरे वितरणासाठी सज्ज
बीडीडी वासियांना मोठा दिलासा
Naigaon BDD chawl redevelopment key distribution Date: बीडीडीकरांसाठी आनंदाची बातमी! बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत नायगाव बीडीडीतील पाच पुनर्वसित इमारतींमधील ८६४ घरांचे वाटप रखडले गेले. या घरांचे वाटप येत्या काही दिवसांत होणार असल्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे. या बातमीने नायगाव मधील बीडीडी वासियांना दिलासा मिळाला आहे.
तांत्रिक गोष्टी आणि निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे हे काम राखडलं गेलं होत. मात्र आता नागरिकांना त्यांच्या हक्काच्या घराच्या चाव्या मिळणार आहेत. त्यानुसार जानेवारीअखेरीस घरांच्या चावी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्याच्यादृष्टीने मुंबई मंडळाने तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेऊन लवकरच चावी वाटपाच्या कार्यक्रमाची तारीख जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे.
या प्रकल्पांतर्गत मुंबईतील वरळी, ना.म. जोशी मार्ग (परळ), नायगावच्या ८६ एकरवर असलेल्या २०७ चाळींचा समावेश आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाद्वारे १५ हजार ५९३ रहिवाशांचे पुनर्वसन केले जात आहे. ना. म. जोशी मार्ग-परळ प्रकल्पामध्ये २ हजार ५६० निवासी व अनिवासी गाळे असून १४ पुनर्वसन इमारती बांधल्या जात आहेत. नायगाव (दादर) येथे ३ हजार ३४४ निवासी व अनिवासी गाळे २० पुनर्वसन इमारती उभारण्याचे काम सुरू आहे.
वरळीतील ५५६ घरांच्या चावी वाटपानंतर नोव्हेंबर २०२५ मध्ये नायगावमधील ८६४ घरांचे वाटप करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ५ पुनर्वसित इमारतींची चावी वाटपासाठी १२ नोव्हेंबर २०२५ हा मुहूर्त निश्चित करून सर्व तयारी करण्यात आली. मात्र अचानक चावी वाटपाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आणि त्यानंतर चावी वाटपाचा कार्यक्रम लांबला तो लांबलाच.
पण आता काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पालिका निवडणुकीसाठी मतदान आणि त्यानंतर मतमोजणी होणार आहे. त्यामुळ पुढील ४ दिवसांत आचारसंहिता संपुष्टात येणार आहे. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर नायगावमधील ८६४ घरांचे चावी वाटप करण्याच्यादृष्टीने मुंबई मंडळ पुन्हा एकदा कामाला लागले आहे.नायगावमधील ८६४ घरांना निवासी दाखला प्राप्त झाला आहे. घरे वितरणासाठी सज्ज आहेत. त्यामुळे आता केवळ आचारसंहिता संपण्याची प्रतीक्षा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.