MUMBAI METRO LINE 4 UPDATE: CAR SHED ROAD CLEARED FOR WADALA-KASARVADAVALI ROUTE; saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Metro 4: वडाळा-कासारवडवली मेट्रोच्या कारशेडचा मार्ग मोकळा; अंतर, स्टेशन संख्या, Route काय? जाणून घ्या संपूर्ण प्रकल्पाची माहिती

Mumbai Metro 4 : मेट्रो लाईन ४ वडाळा–मुलुंड–ठाणे–कासारवडवली या मार्गावर धावणार असून, लाईन ४एचा विस्तार कासारवडवली ते गायमुखपर्यंत करण्यात आला आहे. मेट्रो लाईन ४ वर एकूण ३२ स्थानके आहेत, तर मेट्रो लाईन ४ए वर २ स्थानके आहेत.

Bharat Jadhav

  • कार डेपोपर्यंतचा मार्ग मोकळा झाल्यामुळे मेट्रो लाईन ४ आणि ४एच्या कामाला वेग

  • महसूल व वन विभागाने ०.३९ हेक्टर खारफुटी वनक्षेत्र एमएमआरडीएकडे हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली

  • कार डेपोच्या कामाला गती मिळाल्याने मुंबई-ठाणे मेट्रो प्रकल्पाच्या उर्वरित कामांनाही वेग मिळण्याची शक्यता

मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या मेट्रोसाठी कारशेडचा मार्ग मोकळा झालाय. मेट्रो लाइन ४ वर ३२ तर ४अ वर २ स्थानकं आहेत.कासारवडवली ते गायमुखपर्यंत मेट्रो ४अ चा विस्तार करण्यात आला आहे. वडाळा- मुलुंड- ठाणे- कासारवडवली- गायमुख मेट्रो-४ आणि ४ए मार्गासाठी मोघरपाडा येथील कार डेपोला जोडणारा रस्ता व जोड मार्गिका बांधण्यासाठी आवश्यक ०.३९ हेक्टर खारफुटी वनक्षेत्र एमएमआरडीएकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय महसूल व वन विभागाने घेतलाय.

या प्रस्तावाला केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे मेट्रो कारशेडकडे ये-जा करण्यासाठी आवश्यक रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झालाय.

भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली

ठाणे मेट्रो प्रकल्पासाठी मोघरपाडा येथे मेट्रो कारशेड उभारण्यासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झालीय. या कार डेपोपर्यंत पोहोचण्यासाठी ६५ मीटर लांबीचा अॅप्रोच रोड, जोड मार्गिका तसेच, संबंधित बांधकाम विकसित केले जाणार आहे. ही जमीन एमएमआरडीएच्या माध्यमातून वापरण्यात येणार आहे. त्यासाठी हस्तांतरण आवश्यक होते. पण या परिसरात कांदळवन असल्याने वनविभागाकडूनच ही जमीन हस्तांतरित करावी लागलीय.

मुंबईला ठाणे शहराशी जोडणारी मेट्रो मार्गिका ४ अंतर ३२ किमी लांबी आहे. ग्रीन लाइनमुळे शहरातील पूर्वीतील उपनगरांना जोडणी मिळणार आहे. वडाळा ते कासारवडवलीपर्यंत जोडणाऱ्या या मार्गिकेमुळे एलबीएल मार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूककोंडी कमी होणार आहे.

कासारवडवलीपासून गायमुखपर्यंत मेट्रो मार्गिका ४अ तयार केली असेल. मेट्रो मार्ग ४ अ काम पूर्ण होत आले आहे. ४ ब चं बांधकाम सुरू होणार आहे. ऑगस्ट २०२६ पर्यंत हा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. गायमुखपर्यंत मार्ग २०२९ /२०३० पर्यंत प्रवासासाठी खुला होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोणत्या स्थानकांचा समावेश

मेट्रो मार्गिका ४ वर एकूण ३२ स्थानकं आहेत.

भक्ती पार्क मेट्रो,

वडाळा टीटी,

अनिकनगर बस डेपो,

समुन नगर,

सिद्धार्थ कॉलनी,

अमर महाल जंक्शन,

गरोदिया नगर,

पंत नगर,

लक्ष्मी नगर,

श्रेयस सिनेमा,

गोद्रेज कंपनी,

विक्रोळी मेट्रो,

सूर्य नगर,

गांधी नगर,

नॅवल हाऊसिंग,

कांजुरमार्ग पश्चिम,

भांडुप पश्चिम,

शंग्रिला,

सोनापूर,

मुलुंड अग्निशमन केंद्र,

मुलुंड नाका,

तीन हात नाका,

ठाणे आरटीओ,

महापालिका मार्ग,

कॅडबरी जंक्शन,

माजिवाडा,

कापुरबावडी,

मानपाडा,

टिकूजी-नी-वाडी,

डोंगरीपाडा,

कासारवडवली या स्थानकांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या सोनम मस्करचा लक्षवेध, १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक

Ganesh Visarjan: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जन करताना इंजिनिअरिंगच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत

Hill Station: मडगावपासून फक्त 2 किमी अंतरावर आहे हे हिल स्टेशन; मुंबईकरांचं फेव्हरेट डेस्टिनेशन

konkan Beach : महाराष्ट्रातील मिनी मालदीव! कोकणातील समुद्राच्या सौंदर्याला तोड नाही, एकदा फेरफटका माराच

SCROLL FOR NEXT