Mumbai Metro Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नववर्ष सेलिब्रेशनसाठी मेट्रो रात्रभर धावणार; कसं असेल वेळापत्रक

Mumbai Metro service on 31st December Night: नववर्ष सेलिब्रेशनसाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा मोठा निर्णय. ३१ डिसेंबरच्या रात्री मेट्रो-३ ‘ॲक्वालाईन’ रात्रभर सुरू राहणार, प्रवाशांसाठी विशेष फेऱ्यांचे नियोजन.

Shruti Vilas Kadam

Mumbai Metro service on 31st December Night: नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री मुंबईकर मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात. पार्टी, कार्यक्रम आणि मित्र–परिवारासोबत सेलिब्रेशननंतर मध्यरात्री किंवा पहाटे घरी परतणं अनेकदा कठीण ठरतं. हीच अडचण लक्षात घेऊन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) ने मुंबईकरांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी मेट्रो-३ म्हणजेच ‘ॲक्वालाईन’ रात्रभर सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

MMRC कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १०:३० वाजल्यापासून ही विशेष मेट्रो सेवा सुरू होणार असून, १ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ५:५५ वाजेपर्यंत मेट्रोच्या विशेष फेऱ्या चालू राहतील. त्यानंतर कोणताही खंड न पडता १ जानेवारीची नियमित मेट्रो सेवा सकाळी ५:५५ वाजल्यापासून सुरू होईल. म्हणजेच, ३१ डिसेंबरच्या रात्रीपासून ते १ जानेवारीच्या सकाळपर्यंत मुंबईकरांना सलग मेट्रो सेवा उपलब्ध असेल.

दरवर्षी थर्टी फर्स्टच्या रात्री मुंबईत मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. रस्त्यांवर वाहतूक कोंडी, टॅक्सी–रिक्षांची कमतरता आणि भाडेवाढ यामुळे प्रवाशांचे हाल होतात. अशा परिस्थितीत मेट्रो रात्रभर सुरू राहिल्याने वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे.

विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबांसाठी हा निर्णय अत्यंत दिलासादायक आहे. सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाल्याने नववर्ष साजरं करताना मुंबईकरांना प्रवासाची चिंता करण्याची गरज भासणार नाही. तसेच, खासगी वाहनांचा वापर कमी झाल्याने अपघातांचे प्रमाणही घटण्याची शक्यता आहे.

मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, नववर्षाचा आनंद साजरा करताना मेट्रोच्या नियमांचे पालन करावे, गर्दी टाळण्यासाठी सहकार्य करावे आणि सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करावा. मुंबईकरांसाठी ही रात्रभर मेट्रो सेवा म्हणजे नववर्षाच्या स्वागताला मिळालेली एक मोठी भेट ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : म्हाडा मुंबई मंडळाच्या ८४ अनिवासी गाळ्यांच्या ई-लिलावाला मुदतवाढ

IND vs NZ 1st T20: पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी

धावत्या लोकल ट्रेनमध्ये चोरट्याने बदलापूरच्या तरुणाला धक्का दिला; चाकाखाली आल्याने पायाचे तुकडे, डोक्यालाही दुखापत

Daldal Trailer Out: नुसती कापाकापी! हिंसा पाहून अंगावर येईल काटा, थरकाप उडवणारा ‘दलदल’चा ट्रेलर प्रदर्शित

Thursday Horoscope : तुमच्याविरुद्ध कोणीतरी कट रचण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना सावध निर्णय घ्यावा लागणार

SCROLL FOR NEXT