Mumbai Mega Block Today in Marathi: मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेच्या मार्गावर तब्बल १४ तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. शनिवारी रात्री १२ वाजेपासून रविवारी दुपारी २ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे.
या कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून, काही लोकल विलंबाने धावणार आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा विकेंडनिमित्त घराबाहेर पडणार असाल, तर रेल्वेचं वेळापत्रक जाणून घेणं गरजेचं आहे. (Latest Marathi News)
मुंबईची लाईफलाईन म्हणून मुंबई लोकल (Mumbai Local Train) ट्रेनला ओळखलं जाते. दररोज या लोकल ट्रेनने लाखो मुंबईकर प्रवास करत असतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या शहरात काम करण्यासाठी येतात. मुंबईमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे ही गर्दी वाढत आहे. अशातच रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक असल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडते.
पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी ते गोरेगाव स्थानकादरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी पश्चिम रेल्वेने शनिवारी आणि रविवारी तब्बल १४ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळे अनेक लोकल सेवा रद्द असतील. रेल्वे प्रशासनाने ही माहिती दिली आहे.
या मेगाब्लॉकची (Megablock) वेळ शनिवारी रात्री १२ ते रविवारी दुपारी २ वाजेपर्यंत असेल. या ब्लॉकमुळे अंधेरी आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सर्व अप आणि डाऊन लोकल जलद मार्गावर चालवल्या जातील आणि प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे राम मंदिर स्थानकावर थांबणार नाही. (Breaking Marathi News)
मध्य रेल्वेवरून धावणाऱ्या सर्व हार्बर मार्गावरील सेवा वांद्रे स्थानकापर्यंत चालविण्यात येतील. याशिवाय दुपारी १२.१६ आणि २. ५० वाजताची चर्चगेट- बोरिवली लोकल विरारपर्यत धावेल. बोरिवलीहून दुपारी १. १४ आणि ३. ४० वाजताची बोरिवली-चर्चगेट लोकल रद्द असेल. त्याऐवजी दोन अतिरिक्त जलद लोकल विरारहून चर्चगेटसाठी दुपारी १.४५ व ४. १५ वाजता सोडल्या जातील.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.