Mega Block x
मुंबई/पुणे

Mega Block : ऐन नवरात्रौत्सवात प्रवाशांचे हाल! रविवारी 'या' मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे, कसा? पाहा वेळापत्रक

Mumbai Mega Block : विविध अभियांत्रिकी आणि देखभाल संबंधित कामे करण्यासाठी मध्य रेल्वे, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गांवर मेगा ब्लॉक असणार आहे. या संबंधित माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

Yash Shirke

Mega Block Update : रेल्वेची विविध आभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेवरील विद्याविहार ते ठाणे स्थानकांदरम्यान मुख्य मार्गावर मेगा ब्लॉक परिचलीत केला जाणार आहे. याशिवाय हार्बर-ट्रान्स हार्बर मार्गावरही काही तास ब्लॉक असणार आहे. रविवारी २८ सप्टेंबर रोजी मध्य-हार्बर मार्गावरील ब्लॉक संबंधित माहिती रेल्वे प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात २८.०९.२०२५ रोजी मेगा ब्लॉक परिचालीत करण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार, २८.०९.२०२५ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान मुख्य मार्गावरील ५व्या आणि ६व्या मार्गिकांवर आणि ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक परिचलीत करणार आहे.

मुख्य मार्गावरील ब्लॉक - विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान ५व्या आणि ६व्या मार्गावर ०८.०० ते १३.३० पर्यंत

- डाउन मेल/एक्सप्रेस गाड्यांचे डायवर्जन

खालील डाउन मेल/एक्सप्रेस गाड्या ब्लॉकच्या कालावधीत विद्याविहार स्थानकावर डाउन जलद मार्गावर मार्गबदल केले जातील, ठाणे स्थानकावर ५व्या मार्गावर पुनःमार्गबदल करून १० ते १५ मिनिटे उशिराने सुपूर्द केल्या जातील.

  • ट्रेन क्र. 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्सप्रेस

  • ट्रेन क्र. 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस – जयनगर पवन एक्सप्रेस

  • ट्रेन क्र. 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपूरम नेत्रावती एक्सप्रेस

  • ट्रेन क्र. 17222 लोकमान्य टिळक टर्मिनस – काकीनाडा एक्सप्रेस

- अप मेल/एक्सप्रेस गाड्यांचे डायवर्जन

ब्लॉक कालावधीत पुढील अप मेल/एक्सप्रेस गाड्या (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेसकडे जाणाऱ्या) ठाणे येथे अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि त्या आपल्या गंतव्यस्थानावर १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

  • ट्रेन क्रमांक 11010 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस

  • ट्रेन क्रमांक 12124 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन

  • गाडी क्रमांक 12126 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस

  • ट्रेन क्रमांक 12140 नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सेवाग्राम एक्सप्रेस

  • गाडी क्रमांक 22226 सोलापूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस

  • ट्रेन क्रमांक 12321 हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल

  • ट्रेन क्रमांक 11012 धुळे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

खालील अप मेल/एक्सप्रेस गाड्या (लोकमान्य टिळक टर्मिनस बाऊंड) ब्लॉकच्या कालावधीत ठाणे स्थानकावर अप जलद मार्गवर मार्गबदल केल्या जातील, विद्याविहार स्थानकावर ६व्या मार्गावर पुनःमार्गबदल करून १० ते १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.

  • ट्रेन क्रमांक 13201 राजगीर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

  • ट्रेन क्रमांक 17221 काकीनाडा - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

  • ट्रेन क्रमांक 12168 बनारस- लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस

  • ट्रेन क्रमांक 12812 हटिया- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

ठाणे आणि वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान अप व डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावर ११:१० ते १६:१० पर्यंत

  • वाशी/नेरूळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप व डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा ब्लॉकच्या कालावधीत थांबवण्यात येईल.

  • ठाणे स्थानकातून वाशी/नेरूळ/पनवेलकडे जाणाऱ्या डाउन मार्गावरील सेवा १०:३५ ते १६:०७ आणि पनवेल/नेरूळ/वाशी येथून १०:२५ ते १६:०९ पर्यंत ठाणेकडे जाणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Digital Payment होणार सोपं आणि सुरक्षित! OTP व्यतिरिक्त फिंगरप्रिंट आणि पासवर्डनेही होणार व्यवहार

Maharashtra Live News Update: नंदुरबार शहरासह परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात

ये मेरा दिल प्यार का दिवाना... अतिवृष्टीमुळे बळीराजा टाहो फोडत असताना शिंदेसेनेनं भरवला गौतमी पाटीलचा कार्यक्रम, VIDEO

Sugar Cravings: सतत मूड स्विंग्स, ताण अन् थकवा? मग आत्ताच हा १ पदार्थ सोडा

Dombivali News : डोंबिवली हादरली; मुख्याध्यापकाचे ७ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; ६ वर्षांपूर्वीही केलं होतं असंच कृत्य, पण...

SCROLL FOR NEXT