Ghatkopar Fire Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Fire : घाटकोपरमध्ये अग्नितांडव! ऑर्किड टॉवरमध्ये भीषण आग, परिसरात धुरांचे लोट

Ghatkopar Fire : मुंबईच्या घाटकोपर विभागामधील ऑर्किड टॉवरमध्ये भीषण आग लागली आहे. टॉपर क्रमांक सहाच्या चौथ्या माळ्यावर आग लागल्याने परिसरात धुराचे लोट पाहायला मिळत आहेत.

Yash Shirke

मयुर राणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Mumbai News : मुंबईतील घाटकोपर विभागातील ऑर्किड रेसिडेन्सीच्या टॉवरला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ऑर्किड रेसिडेन्सीमधील टॉवर नंबर सहामध्ये आग लागली आहे. चौथ्या माळ्यावर असलेल्या एका फ्लॅटमध्ये ही आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या चारहून अधिक गाड्या दाखल झाल्या आहे. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. घटनास्थळी मुंबई पोलीस देखील दाखल झाले आहेत.

बातमी अपडेट होत आहे.

घाटकोपर पश्चिम येथील १५ मजली निवासी टॉवरच्या चौथ्या मजल्यावर रविवारी (२२ जून) दुपारी आग लागली. अग्निशमन दलाला दुपारी साडेबारा-एकच्या सुमारास एलबीएस रोडवरील आरसिटी मॉलच्या मागे असलेल्या ऑर्किड रेसिडेन्सीमधील टॉवर क्रमांक सहामधून धूर आणि ज्वाळा येत असल्याची सूचना मिळाली.

त्यानंतर अग्निशमन दलाच्या चारपेक्षा जास्त गाड्या, पीडब्लूडी अधिकारी, पोलीस दल, अदानी पॉवर कर्मचारी, स्थानिक वॉर्ड कर्मचारी आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. या अग्नितांडवामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सध्या म्हटले जात आहे. आग लागण्याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

घाटकोपरमध्ये धक्कादायक प्रकार!

घाटकोपरमधील एका २८ वर्षीय महिला पायलटवर कॅबमध्ये विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कॅब चालकासह तिघांजणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिलेने रात्री काळाघोडाहून कॅब बुक केली होती. घाटकोपर पोलीस ठाण्यात पीडित महिलेने तक्रार केल्यानंतर हा प्रकार समोर आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Travel : भारतातील या ठिकाणी घ्या हाऊसबोट्समध्ये राहण्याचा शानदार अनुभव, जाणून घ्या ठिकाणे

Makar Sankranti: यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे वापरु नयेत? महिलांसाठी खास सुचना...

बॉम्बे हे महाराष्ट्राचं शहर नाही, भाजप नेत्याच्या वक्तव्याने वाद उफळला

Padded Blouse Designs: बॅकलेस आणि डीप नेक साडीवर उठून दिसतील पॅडेड ब्लाऊज, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

Maharashtra Live News Update : किल्ले रायगडावर सुरु होणार लाईट अँड साऊंड शो

SCROLL FOR NEXT