Mumbai Bandra Fire Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Bandra Fire : मुंबईच्या वांद्र्यात भीषण आग; 25 ते 30 झोपड्या जळून खाक,VIDEO

Mumbai Bandra Fire update : मुंबईच्या वांद्रे पूर्व भागात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत 25 ते 30 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. या आगीमुळे जवळील जंगलाचंही मोठं नुकसान झालं आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे, साम टीव्ही

Mumbai Fire : मुंबईत आगीचं सत्र सुरुच आहे. मुंबईच्या वांद्रे परिसरात आग लागल्याची घटना घडली आहे. या परिसरातील झोपड्यांना आग लागली आहे. या आगीमुळे परिसरात धुराचे प्रचंड लोट पाहायला मिळत आहे. आग लागल्याची घटना घडताच अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या वांद्र पूर्व भागात भीषण आग लागल्याची घटना घडली होती. मुंबईच्या वांद्रे पूर्व भागातील भारत नगर परिसरात ही मोठी आग लागली आहे. भारतनगर परिसरातील खाडी किनाऱ्यावरील तिवराचे जंगल आणि कचराकुंडीला मोठी आग लागली आहे. भारतनगर परिसरात लागलेल्या आगीमुळे धुराचे प्रचंड मोठं लोट पसरले आहे. आग लागल्याची माहिती परिसरात बघ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. या भीषण आग लागल्याच्या घटनेनंतर ३ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

मुंबईच्या वांद्रे पूर्व भागात असलेल्या तीवराच्या जंगाला ही आग लागली. या लागलेल्या आगीत तीवरा जंगलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. परिसरात धुराच या आगीच २५ ते ३० कच्च्या झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. या आगीत सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच धावपळ उडाली. अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियत्रंण मिळवण्यास सुरुवात केली. या जवानांनी पाण्याचा फवारा मारण्यास सुरुवात केली.

तीवराच्या जंगलाला लागलेल्या आगीनंतर परिसरात आकाशात धुराचे लोट पसरले. या भीषण आगीत जंगलातील झाडांचं मोठं नुकसान झालं आहे. आगीमुळे जंगलासहित झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. या आगीमुळे परिसरातील काही लोक घराबाहेर आले. या भीषण आगीमुळे लोकांमध्ये दहशत पसरली होती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच पोहोचून आगीवर नियत्रंण मिळवण्यास सुरुवात केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिक दत्तक घेणाऱ्या फडणवीसांनी काय केलं? राज ठाकरेंच्या टीकेनंतर देवाभाऊंनी यादीच वाचून दाखवली|VIDEO

Maharashtra Live News Update : जळगाव महापालिका निवडणुकीतील प्रभाग पाच मधील ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवाराचा चक्क अपक्ष उमेदवाराला पाठिंबा..

Love Tragedy : प्रेमाचा दुर्दैवी अंत! धावत्या वंदे भारत एक्सप्रेससमोर उडी मारून प्रेमीयुगुलाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण आलं समोर

Daily Wear Saree Designs: डेली वेअरसाठी या आहेत युनिक आणि ट्रेडिंग 5 साड्या

Daily Yoga Workout: फिट राहण्यासाठी रोज करा हे 4 योगा

SCROLL FOR NEXT