Mumbai Malad Hit and Run Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Accident : वरळीनंतर मालाडमध्ये भीषण अपघात; अलिशान कारने महिलेला चिरडलं अन् दूरपर्यंत फरफटत नेलं

Mumbai Malad Hit and Run : वरळी येथील अपघाताची घटना ताजी असतानाच मुंबईत पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली. मालाड परिसरात एका कारने महिलेला जोरदार धडक दिली.

Satish Daud

संजय गडदे, साम टीव्ही

पुणे आणि वरळी येथील अपघाताची घटना ताजी असतानाच मुंबईत पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. मालाड परिसरात एका कारने महिलेला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की कारचालकाने महिलेला दूर फरफटत नेलं. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी रात्रीच्या सुमारास अपघाताचा हा थरार घडला. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाला अटक केली आहे.

त्याच्यावर विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. आमदार अस्लम शेख यांच्या बंगल्यासमोरील रस्त्यावरच हा अपघात झालाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे वय 27 वर्ष असून ती मेहंदी क्लाससाठी गेली होती. मंगळवारी रात्री उशिरा घरी परतत असताना अचानक सुसाट वेगात कार आली. या कारने महिलेला जोरदार धडक दिली. इतकंच नाही तर तिला दूर फरफटतही नेलं.

या भीषण अपघातात महिला गंभीर जखमी झाली होती. अपघातानंतर स्थानिकांनी आधी कारचालकाला चोप दिला. मात्र, त्यानंतर जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराआधीच महिलेचा मृत्यू झाला. कारचालक हा मर्चंट नेव्हीमध्ये सेवेला असून स्थानिकांच्या मारहाणीत तो देखील जखमी झाला आहे.

दरम्यान, अपघाताच्या या घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. काहींनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा करत पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी कारचालकाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मुंबईत दिवसेंदिवस अपघातांच्या घटना वाढतच आहेत. अगदी दोन दिवसांपूर्वी वरळी परिसरात बेस्ट बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या 9 जणांना चिरडलं होतं. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. तर 8 जण गंभीर जखमी झाले होते. मद्यधुंद प्रवाशाने धावत्या बसचे स्टेअरिंग खेचल्याने हा अपघात झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत मद्यपीला अटक केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

SCROLL FOR NEXT