Malad Garba Festival 
मुंबई/पुणे

मालाडमध्ये गरबा महोत्सवासाठी अनोखी अट; गोमूत्र-कुंकवाचा टिळा आणि सनातनी धर्म मान्य असणाऱ्यांनाच प्रवेश

Malad Garba Festival : मुंबईतील मालाड पश्चिम येथील गरबा महोत्सवाची सध्या चर्चा सुरू आहे. भाजप नेते विनोद शेलार यांनी गरब्यात प्रवेशासाठी सनातनी धर्म मान्य करण्याची आणि गोमूत्रमिश्रित कुंकवाचा टिळा लावण्याची अट घातली आहे.

Namdeo Kumbhar

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

नवरात्रोत्सवानिमित्त मुंबईसह देशभरात गरबा, रास आणि दांडिया महोत्सवांचा उत्साह पाहायला मिळत असताना, मालाड पश्चिम येथील एका गरबा महोत्सवाची मात्र वेगळ्याच कारणाने चर्चा सुरू झाली आहे. भाजप नेते व प्रदेश सरचिटणीस विनोद शेलार यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य गरबा महोत्सवात सहभागी होणाऱ्यांसाठी 'सनातनी धर्म' मान्य करण्याची अट शेलार यांनी घातली आहे. तसेच गरबा मैदानात प्रवेश करताना कपाळावर गोमूत्रमिश्रित कुंकवाचा टिळा लावणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ज्यांना या अटी मान्य नसतील, त्यांना महोत्सवात प्रवेश दिला जाणार नसल्याचे आयोजकांनी सांगितले.

घटस्थापनेपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून, पुढील दहा दिवस मुंबईतील विविध भागांत गरबा आणि दांडियाचे रंगतदार आयोजन पाहायला मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर मालाड पश्चिम येथे या भव्य गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची सुरुवात 'वंदे मातरम्' या गीताने करण्यात आली. 'वंदे मातरम्' गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने या माध्यमातून राष्ट्रभक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला.

मात्र, या महोत्सवात सहभागी होण्यासाठी सनातनी धर्म मान्य करण्याची अट आणि गोमूत्रमिश्रित कुंकवाचा टिळा लावण्याची सक्ती केल्यामुळे हे आयोजन राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. गरबा महोत्सवात सहभागी होणाऱ्या तरुण-तरुणींनी सनातनी धर्म मान्य करावा, अशी स्पष्ट भूमिका विनोद शेलार यांनी मांडली. टिळा लावण्यास किंवा या अटी स्वीकारण्यास नकार देणाऱ्यांना थेट प्रवेश नाकारला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

अमली पदार्थांच्या विरोधात लढा उभारण्याचे आवाहन

दरम्यान, मुंबईतील मालाड-मालवणी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून ड्रग्ज आणि अमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनल्याचा मुद्दा विनोद शेलार यांनी या व्यासपीठावरून उपस्थित केला. "देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला 'ड्रग्जमुक्त' करण्याचे स्वप्न पाहिले आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्राला अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्याचा संकल्प केला आहे," असे ते म्हणाले.

मालाड-मालवणी परिसरातील अमली पदार्थांची विक्री आणि नशाखोरांचे वाढते प्रस्थ नष्ट करण्यासाठी तरुण पिढीला बळ मिळावे, अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली. 'माँ दुर्गे'च्या आशीर्वादाने आजच्या 'जेन झी' (Gen Z) म्हणजेच नव्या पिढीला या व्यसनाधीनतेविरोधात लढण्याची प्रेरणा मिळावी, अशी अपेक्षा शेलार यांनी व्यक्त केली.

दिव्यांगांसोबत गरबा खेळून वाढवला आनंद

या गरबा महोत्सवात धार्मिक अटी आणि सामाजिक संदेशांसोबतच सर्वसमावेशकतेचे चित्रही पाहायला मिळाले. आयोजक विनोद शेलार यांनी स्वतः दिव्यांग व्यक्तींसोबत गरबा खेळत त्यांच्या आनंदात सहभाग घेतला, ज्यामुळे उपस्थितांचा उत्साह द्विगुणित झाला.

एकीकडे नवरात्रोत्सवातील भक्ती, परंपरा आणि राष्ट्रभक्तीचा संदेश, तर दुसरीकडे अमली पदार्थांविरोधात तरुणांनी एकत्र येण्याचे आवाहन आणि दिव्यांग व्यक्तींसोबत साजरा केलेला उत्सव; अशा विविध कारणांमुळे मालाड पश्चिमेतील हा गरबा महोत्सव सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest: दिल्लीत जनसागर! 'इंडिया' आघाडीचा सुप्रीम कोर्टावर महामोर्चा; पाहा खास फोटो

Maharashtra News Live Update : जंतर-मंतरवर खळबळ! CJPचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका पोलिसांच्या ताब्यात

Old Monk बंदीमुळे महाराष्ट्राला ३५० कोटींचा फटका; RUM च्या विक्रिला FSSAI कडून परवानगी पण टाकली मोठी अट

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवा, या राज्य सरकारने थेट ठराव मंजूर केला

Chia seeds benefits: दूध की पाणी? चिया सिड्स कशात भिजवून खाल्ल्यास मिळतील फायदे?

SCROLL FOR NEXT