Accident News Saam TV
मुंबई/पुणे

Accident News: लग्नाला फक्त एक महिना शिल्लक असताना नवरदेवाचा मृत्यू; मुंबई मनपा रुग्णालयात नेमकं काय घडलं?

Mahanagar Palika Hospital News: ऐन लग्न तोंडावर असताना त्याने पाहिलेल्या स्वप्नांचा चुराडा झालाय. लग्नानंतर सुखी संसारासाठी त्याने स्वत:ला कामांमध्ये झोकून दिलं होतं. मात्र त्याचं लग्नाचं स्वप्न देखील पूर्ण होऊ शकलेलं नाही.

Ruchika Jadhav

सिद्धेश म्हात्रे

Mumbai:

मृत्यू कधी कसा ओढावेल काहीच सांगता येत नाही. हसता-खेळता काही व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येतो, किंवा अपघातातही काहींना मृत्यू कवटाळतो. नवी मुंबई मनपा रुग्णालयात देखील अशीच एक हृदयद्रावक घटना घडली आहे.

रुग्णालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झालाय.मनोज कुमार असं या कर्मचाऱ्याचं नाव असून वाशी येथील नवी मुंबई मनपा प्रथम संदर्भ रुग्णालयात काम करत होता. 25 वर्षीय मनोज कुमार काम करत असताना त्याच्या सुरक्षेची कोणतीही काळजी कंत्राटदाराने घेतली नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप कामगार संघटनांकडून करण्यात येतोय.

यासोबतच या कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करुन कामगाराला देखील योग्य मोबदला देण्याची मागणी कामगार संघटना करत आहेत. महत्वाचं म्हणजे मनोजचे पुढील महिन्यात लग्न होते. मात्र त्या आधीच त्याच्यावर काळाचा आघात झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येतेय.

ऐन लग्न तोंडावर असताना त्याने पाहिलेल्या स्वप्नांचा चुराडा झालाय. लग्नानंतर सुखी संसारासाठी त्याने स्वत:ला कामांमध्ये झोकून दिलं होतं. मात्र त्याचं लग्नाचं स्वप्न देखील पूर्ण होऊ शकलेलं नाही. त्याच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना समजल्यावर सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. तसेच ज्या मुलीशी त्याचं लग्न ठरलं होतं तिच्यावरही दु:खाचा मोठा डोंगर कोसळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

SCROLL FOR NEXT