Mumbai Local Train News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल २० मिनिटं उशिराने; मुंबईकरांचे प्रचंड हाल

Mumbai Local Train: आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकलसेवा २० मिनिटं उशिराने धावत आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

Priya More

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील लोकलसेवा १५ ते २० मिनिटं उशिराने सुरू आहे. त्यामुळे आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईकरांचे चांगलेच हाल होत आहे. ऐन गर्दीच्या वेळी लोकल उशिराने धावत असल्यामुळे सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे. लोकलमध्ये प्रवाशांना चढता येत नाही त्यामुळे आजही त्यांना ऑफिसला पोहचायला उशिर होत आहे.

मध्य रेल्वेच्या कुर्ला रेल्वे स्थानकावर सोमवारी रात्रीच्या सुमारास ओव्हर हेड वायर तुटली होती. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणारी अप जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मध्य रेल्वेकडून तात्काळ दुरूस्तीचे काम करण्यात आले. प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी मुलुंड आणि दादर रेल्वे स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावरील लोकल अप स्लो मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. लोकल वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे लोकल एकामागे एक थांबल्या होत्या. त्याचा परिणाम आता सकाळपासून देखील पाहायला मिळत आहे.

सोमवारी रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटली होती. कुर्ला आणि सायन स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली होती. त्यामुळे आसनगाव, कर्जत आणि कल्याणकडे जाणाऱ्या लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती. लोकलसेवा रात्री उशिराने धावत होत्या. अनेक स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. त्यांना घरी जाण्यासाठी खूपच उशिर झाला. लोकलसेवा उशिराने धावत असल्यामुळे लोकलमध्ये देखील गर्दी प्रचंड होती.

रात्री कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर इतर लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर वळवण्यात आल्या. स्लो ट्रॅकवरून लोकल चालवण्यात आल्या होत्या. दरम्यान, ४० मिनिटांत ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. पण तरी देखील रात्री उशिरापर्यंत लोकलसेवा उशिरानेच सुरू होत्या. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यातील रेड लाईट एरियात बांगलादेशी महिलांचा सुळसुळाट; अनधिकृत प्रवेश करत वेश्या व्यवसाय

ITR Filling 2025: ITR फाइल करताना पासवर्ड विसरलात? काळजी करु नका, या पद्धतीने भरा रिटर्न

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

SCROLL FOR NEXT