मुंबईकर ज्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत होते, त्या लोकल प्रवासासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी अखेर घोषणा केलीय त्यामुळे मुंबईकरांमध्ये आनंद आहे. पण राज्य सरकार, केंद्र सरकार, प्रशासन, आणि नेत्यांमध्ये या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत संभ्रमावस्था आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सर्वसामान्यांना प्रवासासाठी बंद असलेली लोकल अखेर 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. अट फक्त एकच, तुम्ही दोन कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस घेतलेले असले पाहिजेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भातील घोषणा केलीय. अखेर निदान दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना बऱ्याच महिन्यानंतर रेल्वेने प्रवास करता येणार असल्यामुळे त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे. फक्त त्याचं नियोजन सरकार ने योग्य पद्धतीने करावं असं नागरिक म्हणतायत. (Mumbai Local will start, but how to identify those who have taken two doses of vaccine?)
हे देखील पहा -
काही दिवसांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्याकडून सर्वसामान्य नागरिकांना लोकल प्रवास सुरू करण्यास प्रस्ताव आल्यास लोकल सर्वसामान्यना सुरू केली जाईल, असं म्हटलं होतं. पण मुख्यमंत्र्यांनी लोकल प्रवसाबद्दल ही घोषणा केल्यानंतर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंना लोकलमध्ये गर्दी वाढून रुग्णसंख्या वाढीची भीती वाटू लागलीय. तसेच राज्य सरकार म्हणत असल्याप्रमाणे ते ॲप कसं असेल, कोणाचं लसीकरण खरंच झालाय की नाही, हे बघण्यासाठी यंत्रणा कशी कळेल? असे प्रश्न पडलेत.
याविषयी बोलताना मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी 'पालिका प्रभाग कार्यालयांमध्ये हे प्रमाणपत्र दिले जातील , तसेच ऑनलाईन देखील ज्यांनी डोस घेतले आहेत त्यांना प्रमाणपत्र दिले जाणार असल्याच म्हटलंय', ते प्रमाणपत्र दाखवून रेल्वे पास मिळवता येणार आहे.
रेल्वे प्रवासाची परवानगी नसताना कोविडच्या कारणामुळे ती बंद ठेवल्याचं राज्य सरकार म्हणत होतं. तर राज्याने प्रस्ताव न पाठवल्यामुळे आपण काहीच करू शकत नाही असं केंद्र म्हणत होतं. अखेर या दोन्ही गोष्टी झाल्यामुळे आता लोकल प्रवास करता येईल. पालिका प्रभाग कार्यालयात हे प्रमाणपत्र मिळवता येईल. पण अद्याप ऑनलाईन प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ते अँप आलेल नाही. १५ तारखेआधी ते येईल अशी अपेक्षा आहे. अन्यथा राज्य आणि केंद्र सरकार श्रेयवादाच्या आणि नियोजनाच्या लढाईत सर्वसामान्यांच्या लोकल प्रवास भरकटुन जायची भीती आहे.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.