Mumbai Local Train Update: नवीन वर्षाच्या आगमनासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येचा विचार करत त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गांवर १२ अतिरिक्त लोकल गाड्या चालवण्यात येणार आहेत. सर्वसामान्यांना विचारात घेऊन रेल्वेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
३१ डिसेंबर रोजी असंख्य लोक नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी बाहेर पडतात. तेव्हा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वेद्वारे नववर्षाच्या पूर्वसंध्येला अतिरिक्त गाड्या चालू ठेवल्या जाणार आहेत. या संबंधित एक पत्रकही रेल्वेने प्रसिद्ध केले आहे. या पत्रकानुसार पश्चिम रेल्वे मार्गावर आठ, मध्य मार्गावर चार तर हार्बर मार्गावर चार विशेष लोकल ट्रेन सुरु ठेवल्या जाणार आहेत. या गाड्या मार्गिकेवरील सर्व स्थानकांवर थांबतील असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरील विशेष लोकल गाड्या -
१. मध्यरात्री १.१५ ला चर्चगेटवरुन सुटणार आणि २.५५ वाजता विरारला पोहोचणार.
२. मध्यरात्री २ वाजता चर्चगेटवरुन सुटणार आणि ३.४० ला विरारला पोहचणार.
३. मध्यरात्री २.३० ला चर्चगेटवरुन सुटणार आणि पहाटे ४.१० ला विरारला पोहोचणार.
४. मध्यरात्री ३.२५ ला चर्चगेटवरुन सुटणार आणि पहाटे ५.०५ ला विरारला पोहचणार
५. मध्यरात्री १२.१५ ला विरारहून निघणार आणि १.५२ ला चर्चगेटला पोहोचणार.
६. मध्यरात्री १२.४५ वाजता विरारहून निघणार आणि २.२२ ला चर्चगेटला पोहोचणार.
७. मध्यरात्री १.४० ला विरारहून निघणार आणि ३.१७ ला चर्चगेटला पोहोचणार.
८. मध्यरात्री ३.०५ ला विरारहून निघणार आणि ४.४१ ला चर्चगेटला पोहोचणार.
मध्य रेल्वे मार्गावरील विशेष लोकल गाड्या -
१. मध्यरात्री १.३० ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरुन निघणार आणि ३ वाजता कल्याणला पोहोचणार.
२. मध्यरात्री १.३० वाजता कल्याणहून निघणार आणि ३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला पोहोचणार.
हार्बर रेल्वे मार्गावरील विशेष लोकल गाड्या -
१. मध्यरात्री १.३० ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सहून निघणार आणि २.५० ला पनवेलला पोहोचणार.
२. मध्यरात्री १.३० वाजता पनवेलवरुन निघणार आणि २.५० ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला पोहोचणार.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला बाहेर फिरायला निघालेल्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. या विशेष लोकल गाड्या सर्व स्थानकांवर थांबणार असल्याचेही रेल्वेने म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.