Mumbai Local Update Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Update: पहिल्याच पावसाने मुंबईकरांची दाणादाण; लोकल विस्कळीत, नागरिकांचे हाल

Delayed In local Train Central Railway Due To Rain: पहिल्याच पावसाचा मुंबई लोकलला फटका बसताना दिसत आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Rohini Gudaghe

सचिन गाड, साम टीव्ही मुंबई

पहिल्याच पावसाचा मध्य रेल्वेला फटका बसल्याचं दिसत आहे. जलद मार्गावरील सेवा उशिराने सुरू आहे. अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा उशिराने सुरू असल्याचं समोर आलं आहे. आंबरनाथ दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्यामुळे लोकल सेवा विस्कळित झाल्याची माहिती मिळत आहे. पहिल्याच पावसाने मुंबई लोकल विस्कळीत झाली आहे.

ट्रेन आज उशिराने धावत आहेत. लोकलचं वेळापत्रक विस्कळीत झालं आहे. त्यामुळे नागरिकांना कामावर जाताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही स्थानकात धीम्या गतीनं वाहतूक सुरू (Mumbai Local Update) आहे. मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये पाऊस कोसळत आहे. पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

मुंबईत पहिल्या पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला (Central Railway) बसला आहे. मुंबईत लोकलचं वेळापत्रक कोलमडले आहे. पावसाचा मध्य रेल्वेला मोठा फटका बसला आहे. अंबरनाथमध्ये सिग्नल यंत्रणेत बिघाड झालाय, त्यामुळे लोकल विस्कळीत झाली (Delayed In local Train) आहे. रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहन चालवताना नागरिकांचे हाल होत आहेत.

मुंबईत पावसाची संततधार बरसत (Mumbai Rain Update) आहे. पहाटेपासून मुंबईमध्ये ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने पुढील ३ ते ४ तास मुंबईमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात विजेच्या कडकडाटसह पावसाची शक्यता आहे. कल्याण डोंबिवलीत देखील पाऊस झाला आहे. मुंबईत पहिल्याच पावसाचा वाहतुकीवर परिणाम झाल्याचं दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT