Mumbai Local Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai Local : अवकाळी पावसाने मुंबईची लोकलसेवा कोडमडली; अनेक स्थानकांवर गर्दीचा महापूर, पाहा Video

Mumbai Local Update : मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे लोकल सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. कामारून घरी परताणाऱ्या लोकांचे मोठे हाल झाले असून अनेक स्टेशनवर गर्दीचा महापूर आला आहे.

Sandeep Gawade

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे लोकल सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. कामारून घरी परताणाऱ्या लोकांचे मोठे हाल झाले असून अनेक स्टेशनवर गर्दीचा महापूर आला आहे. लोकमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची चढाओढ सुरू असून दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

ऐन गर्दीत एका महिलेचा जीव वाचवण्यात रेल्वे प्रवाशांना यश आलं आहे. ठाणे रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर कसारा लोकल स्थानकात थांब्यावर महिलांची लोकलमध्ये जाण्यासाठी गर्दी झाली होती. यावेळी एक महिला खाली गर्दीत खाली पडली होती. या महिलेची गर्दीतून सुटका करण्यात आलं आहे.

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे मुंबईतील मध्यरेल्वे विस्कळीत झाली होती. तर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. त्यामुळे कामावरून परतणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले आहेत. अवकाळी पावसामुळे ठाणे, कल्याण, बद्द्लापूरच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम झाला.

कल्याणकडे जाणाऱ्या फास्ट लोकलचा मार्ग बदलण्यात आला आहे. या रेल्वे कळवा मुंब्रा मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. फास्ट लोकल कळवा व मुंब्रा स्थानकावर थांबवणार आहेत. मुंबई सेंट्रलची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने नोकरदारांचे हाल होत आहेत. मुंबईकडून ठाण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. मुंबईतील मेट्रोसेवा देखील ठप्प झाली आहेत. हवाई वाहतुकीवरदेखील परिणाम झालाय. मुंबईकडे येणाऱ्या अनेक प्लाईट्स दुसरीकडे वळवण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samsaptak Yog: 30 वर्षांनंतर शनी-शुक्र बनवणार समसप्तक योग; 'या' राशींच्या आयुष्यात अचानक येणार सुखाते क्षण

Maharashtra Live News Update: सरन्यायाधीश भूषण गवईंविरुद्ध आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Police Constable Bharti: धक्कादायक! ७,५०० कॉन्स्टेबल पदासाठी १०,००,००० अर्ज; पीएचडी, इंजिनियर अन् पदवीधारकांकडून प्रयत्न

सांगलीत अजित पवारांचा नेता मोठा निर्णय घेणार, पक्षविरहित स्थानिक निवडणूक लढवणार

Dharashiv : गावाजवळील तलावात पोहण्यासाठी गेले; परराज्यातील दोन तरुणांचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT