Pune Satara Highway: मोठी बातमी! खेड शिवापूर टोलनाक्याजवळ टँकर उलटला.. महामार्गावरील वाहतूक ठप्प; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Pune- Satara Highway Traffic News Update: पुणे- सातारा महामार्गावरील खेड- शिवापूर टोलनाक्याजवळ अल्कोहोलने भरलेला टँकर पलटी झाल्याची बातमी समोर येत आहे.
Pune- Satara Highway Traffic News Update:
Pune- Satara Highway Traffic News Update:Saamtv

सागर आव्हाड, पुणे|ता. २३ एप्रिल २०२४

पुणे- सातारा महामार्गावरील खेड- शिवापूर टोलनाक्याजवळ अल्कोहोलने भरलेला टँकर पलटी झाल्याची बातमी समोर येत आहे. महामार्गावर टँकर पलटी झाल्याने वाहतूक ठप्प झाली असून चार क्रेनच्या सहाय्याने या टँकरला बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील खेड शिवापूर टोलनाक्याजवळ अल्कोहोलने भरलेला टँकर पलटी झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. महामार्गावर टँकर उलटल्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. चार क्रेनच्या सहाय्याने या टँकरला बाजूला करण्याचे काम सुरू आहे. या टँकरमधील अल्कोहोल रस्त्यावरती सांडलेले आहे.

टँकरमधील अल्कोहोल रस्त्यावरती सांडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून टँकर हटवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

Pune- Satara Highway Traffic News Update:
Ratnagiri News: शीळ धरणात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू; रत्नागिरी तालुक्यातील दुर्दैवी घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com