Mumbai News: मुंबईत कालपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसाने मुंबईला झोडून काढलं आहे. जोरदरा पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. मुंबईतील काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. तर पावसामुळे रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. (Latest Marathi News)
मुंबईत काल दुपारपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. जोरदार पावसामुळे मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचल्याचं देखील पाहायला मिळत आहे. आज सकाळी देखील मुंबईत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबईच्या विविध भागात पाणी साचले आहे. पावसामुळे रत्यावर वाहनाने प्रवास करणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबई विमानतळाच्या वाकोला गेट नंबर आठ परिसरात देखील सततच्या पावसामुळे पाणी साचले आहे.
मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. मुसळधार पावसात मध्य रेल्वेची कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे कसारा लोकल आसनगाव स्टेशनवर थांबवण्यात आली आहे. तर आसनगावरील लोकल ट्रेन मुंबईच्या दिशेने पाठवण्यात आल्या आहेत. तर मुंबई सीएसएमटीकडे जाणारी ट्रेन १५ ते २० मिनिटे उशिराने धाव आहेत.
गोरखपूर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक एका तासांपासून ठप्प झाली आहे . आसनगाव आणि आटगावदरम्यान इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. यामुळे मध्य रेल्वेची कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
पश्चिम दृतगती महामार्गावर वांद्रे या ठिकाणी वेगात आलेला ट्रक दिभाजकाला धडकल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर दुभाजकाला ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसली तरी त्याच्या दुभाजकाचे नुकसान झाले आहे. ट्रकची डिझेल टाकी फुटल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डिझेल सांडले आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी बॅरिकेट लावून संपूर्ण रस्ता पश्चिम द्रुतगती महामार्गाचा कलेक्टर ऑफिसला जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.