Mumbai Local Train Update Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत;ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड, आता परिस्थिती काय? पाहा व्हिडिओ

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

कल्याण : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेवरील ठाकुर्ली आणि कल्याणदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने ही वाहतूक विस्कळीत झाली. यानंतर रेल्वे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी दोन तासांनी बिघाड दुरुस्त केला. आता सेवा पूर्ववत सुरु झाली आहे.

मध्य रेल्वेवरील धिम्या मार्गावर मागील दोन तासांपासून वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कल्याणच्या दिशेने स्लो ट्रॅकने येणारी वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, दोन तासांतर तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला.

ऐन घरी जाण्याच्या वेळी लोकल खोळंबल्याने प्रवाशांनी ट्रॅकवरून चालत जाऊन कल्याण स्टेशन गाठलं. बिघाड झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलं होतं. मात्र या घटनेमुळे घराकडे परतणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर बिघाड दुरुस्त झाला. रेल्वे वाहतूक सुरळीत झाली. मात्र या घटनमुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते.

ठाणे स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी

दरम्यान, कल्याण आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडाचा फटका मोठ्या संख्येने प्रवाशांना बसला. या बिघाडामळे ठाण्याहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेन २० मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी झाली आहे.

प्रवाशांचे प्रचंड हाल

कल्याण आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवासी ट्रेनमध्येच अडकून बसले. काही प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून रेल्वे स्टेशन गाठलं. तर काही महिलांनी लोकल डब्यात राहणेच पसंत केले. दुसरीकडे सेवा पूर्ववत झाल्यानंतर रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. लोकल सेवा २० मिनिटे उशिराने असल्याने स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. या गर्दीमुळे काही प्रवासी रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sai Baba Controversy : साईबाबा काशीतून हद्दपार! 14 मंदिरांमधून हटवल्या साईंच्या मूर्ती; भक्तांमध्ये संताप,VIDEO

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत भाजपला व्होट जिहादचा फटका? देवेंद्र फडणवीसांचा वार; विरोधकांचा जोरदार पलटवार,VIDEO

Atul Kumar case : दलित विद्यार्थ्यासाठी IITचं दार झालं खुलं; सरन्यायाधीशांचा ऐतिहासिक आदेश, काय आहे नेमकं प्रकरण? वाचा

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? फडणवीस-ठाकरेंची मातोश्रीवर भेट? कुणी केला दावा? पाहा व्हिडिओ

Kolhapur News : हत्येच्या चर्चेने गावभरात खळबळ; पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून समोर आलं भलतंच सत्य

SCROLL FOR NEXT