Western Railway Mega Block on Monday Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी महत्वाची अपडेट, रेल्वेच्या 'या' मार्गावर आज पुन्हा ब्लॉक; कुठे अन् कसा? वाचा...

Western Railway Mega Block on Monday : मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय मोठी आणि महत्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर आज पुन्हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Satish Daud

मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय मोठी आणि महत्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर आज पुन्हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तब्बल साडेसहा तासांचा हा ब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत काही लोकल उशिराने धावणार असून काही गाड्यांचे रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे, असं आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव-कांदिवली रेल्वेस्थानकांदरम्यान सध्या सहाव्या मार्गिकेचे काम सुरु आहे. त्यामुळे रविवारी या मार्गावर तब्बल १० तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. शनिवारी रात्रीपासून ते रविवारी सकाळपर्यंत हा ब्लॉक घेण्यात आला होता. या ब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगाहाल झाले होते. आज पुन्हा पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार असल्याने प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर पुन्हा ब्लॉक

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते अंधेरी अप जलद मार्गावर आज सोमवारी रात्री ११ वाजेपासून ते मंगळवारी पहाटे ५.३० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या कालावधीत जलद मार्गावरील सर्व लोकल रात्री ११ ते पहाटे ३.३० वाजेपर्यंत अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. त्याचबरोबर काही लोकल ट्रेन रद्द करण्यात येणार आहे.

दरम्यान, या ब्लॉकमुळे चर्चगेट-बोरिवली लोकल सोमवारी रात्री १०.२४ वाजता मालाडपर्यंत धावणार आहे. तर रात्री १०.४४ वाजता विरार-अंधेरी जलद वातानुकूलित लोकल फक्त बोरिवली पर्यंतच धावणार आहे. तसेच रात्री ११:५५ वाजेची अंधेरी-भाईंदर जलद वातानुकूलित लोकल रात्री ११.२५ वाजता बोरिवलीवरून चालवण्यात येणार आहे.

मुंबईकरांचा ६ तास खोळंबा होणार

दुसरीकडे मंगळवारी पहाटे ४.०५ वाजेची वांद्रे - बोरिवली लोकल गोरेगावपर्यंत धावणार आहे. ही लोकल पहाटे ४.३८ वाजता गोरेगाव-चर्चगेटसाठी जादा धिमी लोकल म्हणून चालवण्यात येणार आहे. सकाळी ८.१२ वाजता बोरिवली-विरार लोकल नालासोपारापर्यंत चालवण्यात येईल. त्याचबरोबर सकाळी ९.०५ वाजेची विरार-बोरिवली धीमी लोकल बोरिवली-अंधेरी-वांद्रे-दादर-मुंबई सेंट्रल जलद मार्गावरून चर्चगेटपर्यंत धावेल. इतर लोकल ट्रेनची देखील हीच परिस्थिती राहणार आहे. त्यामुळे वेळापत्रक पाहून प्रवासाचे नियोजन करणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आमदार चिखलीकर यांना भविष्यात मोठी जवाबदारी मिळणार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले संकेत

भाजप प्रणित NDAला मोठा हादरा; घटक पक्षातील प्रमुख नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव ट्रकची कारला धडक, २ जवानांसह ५ जणांचा मृत्यू

Dudhi Bhopla Sweet Dish : दुधी भोपळ्याचा हलवा तर खाल्ला असाल, मग एकदा ट्राय करा 'ही' स्वीट डिश

WTC Points Table : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दारूण पराभवाचा भारताला जबरदस्त धक्का, WTC शर्यतीत पाकिस्ताननंही टाकलं मागे

SCROLL FOR NEXT