Mumbai Local Train SAAM TV
मुंबई/पुणे

Mumbai Local : महिला TC तिकीट चेक करत होत्या; ट्रेनमध्येच १९ वर्षीय तरुणीला माइल्ड हार्ट अटॅक, त्याचवेळी...

Mumbai Local Train : मध्य रेल्वेच्या दोन सतर्क महिला तिकीट तपासणीसांमुळं एका १९ वर्षीय तरुणीचा जीव वाचला.

Nandkumar Joshi

Mumbai Local Train : मध्य रेल्वेच्या दोन सतर्क महिला तिकीट तपासणीसांमुळं एका १९ वर्षीय तरुणीचा जीव वाचला. शनिवारी ही घटना घडली. ही तरुणी घणसोली येथील एका कंपनीत नोकरी करते. घरी परतत असताना धावत्या लोकलमध्ये तिच्या छातीत अचानक दुखू लागलं. त्याचवेळी लोकलच्या डब्यात तिकीट तपासणी करणाऱ्या दोन महिला टीसी देवदूतासारख्या धावून आल्या आणि तिचा जीव वाचवला.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या ट्रान्सहार्बर मार्गावर धावत्या लोकलमध्ये हा प्रकार घडला. घणसोली येथील एका कंपनीत नोकरी करणारी १९ वर्षीय तरुणी लोकलमधून प्रवास करत होती. ती बसलेल्या डब्यातच महिला टीसीदेखील होत्या. त्या प्रवाशांकडे तिकीट तपासणी करत होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर शनिवारी साधारण दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली. तरुणी कर्जतला राहते. घणसोलीहून ती आपल्या घरी परतत होती. घरी जाण्यासाठी ती ठाण्याकडे जाणाऱ्या लोकलमध्ये बसली होती. ऐरोली सोडल्यानंतर काही मिनिटांत तिच्या छातीत दुखायला लागले.

महिला टीसी दीपा वैद्य आणि जैन मर्सिला या लोकलच्या त्याच डब्यात प्रवाशांकडील तिकीट तपासणी करत होत्या. या तरुणीच्या छातीत दुखू लागल्याचे त्यांनाही सहप्रवाशांनी सांगितले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मदतीला धावून गेल्या. त्यांनी तात्काळ ठाणे रेल्वे स्थानकात कळवून वैद्यकीय मदतीसाठी तयार राहण्यास सांगितले.

ठाणे स्थानकात ट्रेन पोहोचल्यानंतर आम्ही तातडीने तिला फलाट क्रमांक १ वर असलेल्या मेडिकल क्लिनिकमध्ये नेले. तिची प्रकृती अधिकच गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी रेल्वे पोलिसांच्या मदतीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले.

तरुणीला हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. रेल्वेकडून तरुणीच्या कुटुंबीयांना कळवण्यात आले. त्यांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. तरुणीच्या आईने मुलीचा जीव वाचवणाऱ्या महिला टीसींचे आभार मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT