Mumbai Local saam
मुंबई/पुणे

Mumbai Local: तिकीट तेच सगळ्या लोकल AC, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला मुंबईच्या लाईफलाईनचा मास्टरप्लान

Mumbai Local Train Tragedy: मुंब्रा लोकल अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकलसंदर्भात मास्टर प्लान सांगितला आहे. भाडे न वाढवता वातानुकूलित लोकल सरकार आणण्याच्या तयारीत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

Bhagyashree Kamble

मध्य रेल्वेमार्गावरील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ दोन लोकलच्या घर्षणेमुळे भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत चार निष्पाप प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या भावनाशून्यतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याची मागणीही यानिमित्ताने जोर धरू लागली आहे, जेणेकरून अपघाताचा धोका टळेल. दरम्यान, भाडे न वाढवता वातानुकूलित लोकल सरकार आणण्याच्या तयारीत आहेत, तसा प्लान तयार केला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

मुंब्रा लोकल दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीस तातडीने लक्ष घालत लोकल सेवेसंदर्भात नवीन उपाययोजना जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत. "सोमवारी सकाळी झालेल्या या दुर्दैवी अपघातानंतर मी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी अडीच तास चर्चा केली. उपनगरातील ओव्हरक्राऊडिंगचा प्रश्न गंभीर असून, मेट्रो नेटवर्क अभावी परिस्थिती बिघडली आहे," असं फडणवीस म्हणाले.

"उपनगरातील सर्वाधिक वाढ मोदी सरकारच्या काळात झालेली आहे. दरवाजे लावण्याचा विचार सुरू आहे. सरकारला कळतं व्हेंटिलेशनची व्यवस्था करावी लागेल, डिझाईनही सरकारकडे आहे", असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, "भाडे न वाढवता वातानुकूलित लोकल आणण्याच्या तयारीत सरकार आहे", असा मास्टर प्लान मुख्यमंत्र्यांनी सांगितला.

मुंब्रा लोकल दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं आहे. '९ जून रोजी घडलेल्या अपघाताच्या घटनेनंतर आपल्याला त्यातून शिकावं लागेल. केंद्र तसेच राज्य सरकार यासाठी प्रयत्न करून यातून मार्ग काढेल', असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smartphones: जबरदस्त कॅमेरा अन् दमदार स्टोरेज; 40 हजाराच्या आतमधील शानदार 5G मोबाईल फोन

Crime : सावत्र आईशी अश्लील कृत्य करताना पाहिलं, वडिलांनी मुलाला संपवून नदीत फेकून दिलं

The Bengal Files: विरोधामुळे लाईट बंद केले अन्...; 'बंगाल फाइल्स'च्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये गोंधळ, विवेक अग्निहोत्री संतापले, म्हणाले...

Smallest Country: जगातील असा कोणता देश आहे जिथे फक्त २७ लोक राहतात?

Kokan Nagar Govinda 10 Thar: एकावर एक थर रचत कोकण नगर गोविंदा पथकाने रचला इतिहास, १० थरांची दिली कडक सलामी; पाहा फोटो

SCROLL FOR NEXT