मुंबईची लाईफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलचा खोळंबा काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. सोमवारी मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. आज मंगळवारी पुन्हा एकदा लोकलची वाहतूक विस्कळीत झाली आहे. नेरुळ स्थानकाजवळ भल्यापहाटे ओव्हरहेड वायर तुटली आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
पहाटे साडेपाच वाजता ओव्हरहेड वायर तुटल्याने पनवेल येथून सीएसएमटीकडे (CSMT) जाणाऱ्या अनेक लोकल गेल्या पाऊण तासांपासून खोळंबल्या आहेत. याशिवाय पनवेलहून ठाण्याकडे जाणारी वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. लोकलसेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. पनवेल, बेलापूर, वाशी रेल्वेस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.
ही सेवा सुरळीत होण्यासाठी आणखी दोन तास लागण्याची शक्यता आहे. सध्या वाशी ते सीएसएमटी आणि वाशी ते ठाणे या मार्गावरील लोकल सेवा सुरू आहे. मात्र, पनवेल ते वाशी आणि ठाणे ते पनवेल रेल्वे सेवा (Railway) विस्कळीत आहे. सध्या रेल्वेप्रशासनाकडून तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. रेल्वेच्या या कारभारामुळे प्रवासी चांगलेच संतापले आहेत.
दुसरीकडे गणेशोत्सव सुरु होताच लोकल ट्रेनमधील गर्दी आणखीच वाढली आहे. तिन्ही मार्गावरील ट्रेनमध्ये (Local Train) मोठी गर्दी होत आहे. त्यातच मध्य आणि पश्चिम मार्गावरील लोकल ट्रेन दररोज तब्बल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती मिळाली आहे. लोकल ट्रेन उशिराने असल्याने प्रवास प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करत आहे.
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये दिवसेंदिवस गर्दी वाढतच चालली आहे. त्यामुळे या गर्दीतूनच प्रवाशांना तासंतास प्रवास करावा लागतोय. कर्जत ते डोंबिवली दरम्यान राहणाऱ्या प्रवाशांना तर गर्दीतून कधी दिलासाच मिळत नाहीये. त्यामुळे हजारो प्रवासी लोकल ट्रेनच्या प्रवासाला त्रस्त झाले आहेत. दरम्यान, या गर्दीवरुन डोंबिवलीतील एका कुटुंबीयांनी गणेशोत्सवाच्या देखाव्यातून सरकारला उपाय सुचवला आहे.
डोंबिवलीतील राऊत कुटुंबायांनी यंदा डोंबिलीत लोकल ट्रेनमधील वाढत्या गर्दीची समस्या उचलून धरली आहे. राऊत कुटुंबीयांनी गणेशोत्सवाच्या देखाव्यातून संदेश देत म्हटलं की, 'लोकल गर्दीमुळे आजतायगायत अनेक बळी गेले आहेत. त्यामुळे फक्त लोकलच्या फेऱ्या वाढवून प्रश्न सुटणार नाही. यावर उपाय म्हणजे डोंबिवलीत रोजगार निर्मिती करणे होय'.
'जर डोंबिवलीत एक मोठे आयटी पार्क उभारले गेले तर लोकांना मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही. यामुळे लोकल गर्दी आपोआप कमी होईल. सांस्कृतिक डोंबिवलीसोबत आधुकनिक तंत्रज्ञानाची ओळख असणारी डोंबिवली उभारण्याची काळाची गरज आहे, असे राऊत यांनी सांगितले. त्यांचा गणेशोत्सवाचा देखावा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.