Mumbai local train Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Train : ओव्हरहेड वायरवर बांबू पडला, मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली; भल्यापहाटे प्रवाशांचे हाल

Mumbai local train Latest News : मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बुधवारी पहाटे मोठा मनस्ताप सहन करावा लागला. कारण, आज पुन्हा एकदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.

Satish Daud

मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बुधवारी पहाटे मोठा मनस्ताप सहन करावा लागला. कारण, आज पुन्हा एकदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. सायन आणि माटुंग्याच्या दरम्यान असलेल्या ओव्हर हेडवायरवर अचानक बांबू तुटून पडला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जलद मार्गावरील लोकल गाड्या खोळंबल्या होत्या.

कामावर जायला उशीर होत असल्याने अनेक प्रवाशांनी ट्रॅकवर (Railway Track) उतरुन पायी चालत जाणं पसंत केलं. रेल्वे प्रशासनाकडून तातडीने हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला. मात्र तोपर्यंत अनेक प्रवासी लोकलमधून उतरून आपल्या मार्गाकडे पायी रवाना झाले होते. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ समोर आलाय.

मागील काही दिवसांपासून मध्य रेल्वेची (Mumbai local train) वाहतूक सातत्याने विस्कळीत होत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय. मुंबईची जीवनवाहिनी म्हणून लोकल ट्रेनची ओळख आहे. दररोज लाखो मुंबईकर लोकल ट्रेनने प्रवास करतात. मुंबईच्या एका टोकावरुन दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी लोकल ट्रेनचा प्रवास उत्तम पर्याय आहे.

कमी वेळात आणि कमी खर्चात पोहोचता येतं, म्हणून मुंबईकरांची पहिली पसंती लोकल सेवेला आहे. पण हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. कारण, मागील काही दिवसांपासून लोकल ट्रेनमधील गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

त्यातच तिन्ही मार्गावरील वाहतुकीत सातत्याने खोळंबा होत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. कधी पाऊस, तर कधी ओव्हर हेड वायरचं तुटणं, तर कधी सिग्नल यंत्रणेतील बिघाड यामुळे लोकलने प्रवास करणारे प्रवासी त्रस्त झाले आहेत. आज भल्यापहाटे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जलद मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवासी चांगलाच संताप व्यक्त करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादी आणि भाजपमधील वाद टोकाला

Nashik TCS Case : लैंगिक शोषण अन् अश्लील टोमणे...; नाशिकच्या TCS धर्मांतर प्रकरणात २० तरुणींनी सांगितली आपबीती

Chanakya Niti Tips: 'या' 4 ठिकाणी दान केल्यास व्हाल मालामाल, चाणक्यांनी सांगितले झटपट श्रीमंत होण्याचे मार्ग

Ladki Bahin Yojana: १२००० पुरुषांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; २३ कोटी रुपये लाटले; धक्कादायक माहिती उघड

Ranveer Singh : बॉलिवूडचा 'धुरंधर' झाला कास्टिंग काउचचा शिकार, किस्सा वाचून अंगावर येईल काटा; म्हणाला - 'प्रोड्यूसरने मला पार्टीला बोलावले अन्...'

SCROLL FOR NEXT