Csmt to Mankhurd Harbor Local Train Service Suspended Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Train: मुंबईत पावसाचा कहर! सीएसएमटी ते मानखुर्द हार्बर लोकल सेवा बंद; नागरिकांचे हाल

Mumbai Rain Updates: अतिमुसळधार पावसामुळे मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्द दरम्यान हार्बर लोकल बंद करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबईत पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. रविवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचले असून, त्यामुळे अनेक भुयारी मार्ग बंद करण्यात आले आहेत. मुंबईत अतिवृष्टीचा फटका लोकल ट्रेनलाही बसला आहे.

पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्द दरम्यान हार्बर लोकल बंद करण्यात आली आहे. हार्बरवरील प्रवाशांनी मुख्य मार्गावरून कुर्ला स्थानकापर्यंत प्रवास करावा, अशी उद्घोषणा सीएसएमटी स्थानकात करण्यात येत आहे.

दरम्यान, मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यातच विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या मंगळवार दिनांक ९ जुलै २०२४ रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे.

भारतीय हवामान खात्याने, मुंबई महानगराला अतिमुसळधार इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मुंबई महानगरातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना उद्या मंगळवार ९ जुलै २०२४ रोजी सुटी जाहीर केली आहे.

महानगरपालिका आयुक्तांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, कृपया सर्वांनी सतर्क रहावे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सुचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा मदत सेवा क्रमांक १९१६ यावर संपर्क साधावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरीत बिबट्याची दहशत ,एका रात्रीत चार गुरांना केलं ठार

Panchgrahi Yog: जानेवारीमध्ये शनीच्या राशीत बनणार पॉवरफुल पंचग्रही राजयोग; नव्या वर्षात 'या' राशींना मिळणार छप्परफाड पैसा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹४५०० येणार; तीन महिन्याचे पैसे एकत्र येण्याची शक्यता

राज्यात मानवतेला काळीमा फासणारी घटना, आठवीतील मुलीवर सामूहिक बलात्कार, विवस्त्र सोडून दोघे पळाले

पुन्हा संतोष देशमुखांसारखी हत्या, संभाजीनगरात माजी सरपंचाचा खून, ११ जणांनी लोखंडी रॉड अन् लाठ्या-काठ्यांनी मारले

SCROLL FOR NEXT