Mumbai Local Train Mega Block Update saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Train : रेल्वे प्रवाशांनो, रविवारी वेळापत्रक बघूनच बाहेर पडा; मध्य रेल्वेवर फास्ट ट्रेनचे थांबे बदलणार, हार्बरवर काही लोकल रद्द

mumbai local train mega block sunday : मुंबईत रेल्वेने प्रवास करणाऱ्यांचा रविवार जिकिरीचा जाणार असल्याचं दिसतंय. मध्य रेल्वेने तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेतला आहे. कोणत्या मार्गावर कधी आणि नियोजन कसं असणार आहे, जाणून घ्या.

Nandkumar Joshi

मुंबईत रेल्वेने येत्या रविवारी प्रवास करणार असाल तर, ही महत्वाची बातमी तुमच्यासाठी. मध्य रेल्वेने मुख्य, तसेच हार्बर आणि पश्चिम मार्गावर ब्लॉक घेतला आहे. मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर शॅडो ब्लॉक घेतला आहे. त्यामुळं रविवारी लोकलने प्रवास करणाऱ्यांचे मेगाहाल होण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवारी (ता. ९) विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यानच्या मेन लाईनवर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/ वांद्रे स्थानकांदरम्यानच्या हार्बर लाईनवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

कोणत्या सेवेवर होणार परिणाम?

मेन लाईन:

ब्लॉकचा कालावधी: माटुंगा - मुलुंड स्थानकांदरम्यान 'अप' आणि 'डाऊन' धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ या वेळेत सुटणाऱ्या 'डाऊन' धीम्या मार्गावरील उपनगरी सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान 'डाऊन' जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर पुन्हा 'डाऊन' धीम्या मार्गावर वळवल्या जातील; त्या आपल्या गंतव्यस्थानी नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

ठाणे येथून सकाळी ११.०७ ते दुपारी ३.५१ या वेळेत सुटणाऱ्या 'अप' धीम्या मार्गावरील उपनगरी सेवा मुलुंड स्थानकावर 'अप' जलद मार्गावर वळवल्या जातील. मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान या गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबतील आणि पुढे माटुंगा येथे पुन्हा 'अप' धीम्या मार्गावर वळवल्या जातील; त्या आपल्या गंतव्यस्थानी नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी ११.०० ते सायंकाळी ५ .०० या वेळेत येणाऱ्या किंवा तेथून सुटणाऱ्या सर्व 'अप' आणि 'डाऊन' लोकल गाड्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील.

हार्बर लाईन:

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे (डाऊन हार्बर लाईन) दरम्यान सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (अप हार्बर लाईन) दरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ या वेळेत वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या 'डाऊन' हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  • पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या आणि

  • गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या 'अप' हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  • पश्चिम रेल्वेद्वारे वांद्रे आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० या वेळेत 'शॅडो ब्लॉक' घेण्यात येईल.

  • ब्लॉकच्या कालावधीत पनवेल आणि कुर्ला (फलाट क्रमांक ८) दरम्यान २० मिनिटांच्या अंतराने विशेष सेवा चालवल्या जातील.

हार्बर लाईनवरील प्रवाशांना ब्लॉकच्या कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची मुभा असेल. पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल ब्लॉक आवश्यक आहेत, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Woman Undress In Plane: भरभरा अंगावरचे कपडे काढले अन् प्रवाशांसमोर नाचू लागली; हजारो फुट उंच हवेत उडणाऱ्या विमानात महिलेचं अश्लील कृत्य

भाजपला मोठा धक्का; सहावेळा मंत्री राहिलेल्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Politics: मोठी बातमी! ममता बॅनर्जींना झटका, निवडणूक आयोगाने TMC चं नाव आणि चिन्ह गोठवलं

अमेरिकेच्या संसदेत रशियाविरोधी विधेयक मंजूर, ट्रम्प भारतावरही 100% टॅरिफ लावणार?

Fact Check: एसटी महामंडळात निमशासकीय भरती? सुमारे 13,567 पदांची जाहिरात प्रसिद्ध?

SCROLL FOR NEXT