Mumbai local Mayank Lohar killed case  
मुंबई/पुणे

Mumbai local : मुंबई लोकल हत्याकांडातील धक्कादायक सत्य समोर; दारूच्या नशेत आरोपीने केला पोटात वार

Roshan Suvarna arrested : मुंबई लोकल हत्याकांडात रेल्वे पोलिसांनी ४०० सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी रोशन सुवर्णला अटक केली. दारूच्या नशेत दरवाजा बंद करण्याच्या वादातून मयंक लोहारवर चाकूने वार केल्याचा धक्कादायक घटनाक्रम तपासात समोर आला आहे.

Namdeo Kumbhar

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Mumbai local Mayank Lohar killed case : मुंबई लोकलमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या चाकू हल्ल्यात २२ वर्षीय मयंक लोहारचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी तांत्रिक तपास करत आरोपी रोशन सुवर्ण याला अटक केली आहे. पोलिसांनी तब्बल ४०० सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण आणि १०० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या तपासातून आरोपीच्या प्रवासाचा आणि गुन्ह्याचा संपूर्ण घटनाक्रम समोर आला आहे. (Mumbai local knife attack full incident timeline)

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोशन सुवर्ण हा अंधेरीतील कार्गो परिसरात वडिलांसोबत बारकोड लेबलिंगचे काम करायचा. घटनेच्या दिवशी वडील घरी गेल्यानंतर तो कामाच्या ठिकाणीच थांबला आणि त्याने दारूचे सेवन केले. त्यानंतर ओला किंवा उबेरने घरी जाण्याऐवजी तो रिक्षाने अंधेरी पूर्वेकडील 'आकाश स्वीट्स'जवळ आला आणि तेथून त्याने रेल्वे स्थानकात प्रवेश केला.

दरवाजा बंद करण्यावरून झाली होती बाचाबाची

याच वेळी मृत मयंक लोहार हा देखील अंधेरी स्थानकातून घरी जाण्यासाठी त्याच लोकलमध्ये चढला. पाऊस सुरू असल्याने आरोपी लोकलच्या दरवाज्यात उभा राहून पावसाचा आनंद घेत होता. त्यामुळे मयंक आणि इतर प्रवाशांनी त्याला लोकलचा दरवाजा बंद करण्यास सांगितले. यावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची आणि शिवीगाळ झाली. या वादादरम्यान काही प्रवाशांनी आरोपीला मारहाण केल्याचेही तपासात समोर आले आहे.

मारहाणीच्या रागात बॅगेतून काढला चाकू

प्रवाशांनी केलेल्या मारहाणीत आरोपीच्या डोळ्याला दुखापत झाली होती. याचाच राग मनात धरून संतापलेल्या आरोपीने आपल्या बॅगेतील चाकू काढला आणि मयंक लोहारच्या छातीवर व पोटात सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मयंकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

लोकलमधून उडी मारून ठोकली पळ

या अघोरी कृत्यानंतर बोरिवली स्थानकाजवळ लोकलचा वेग कमी होताच आरोपीने ट्रेनमधून खाली उडी मारली आणि रेल्वे सबवेच्या मार्गाने पलायन केले. त्यानंतर दुसऱ्या लोकलने तो मिरा रोड येथील आपल्या घरी पोहोचला. घरी उशिरा आल्यामुळे कुटुंबीयांनी विचारणा केली असता, "रेल्वेत माझे जोराचे भांडण झाले," एवढेच त्याने सांगितले. मात्र, आपण खून केल्याची कोणतीही माहिती त्याने कुटुंबीयांना दिली नाही, अशी माहिती आरोपीच्या वडिलांनी पोलिसांना दिली.

पनवेलमध्ये लपला होता आरोपी

रात्रभर घरी राहिल्यानंतर, पहाटे सात वाजण्यापूर्वीच आरोपीने बॅगेत चार-पाच जोड कपडे घेतले आणि ओला टॅक्सीने कुर्ला गाठले. तेथून तो पनवेल परिसरात पळून गेला. पनवेलमधील हॉटेल व्यवसायात काम करणाऱ्या आपल्या मित्रांकडे तो लपून बसला होता. अखेर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा माग काढत त्याला अटक केली. आरोपी रोशन सुवर्ण हा अत्यंत तापट स्वभावाचा (शॉर्ट टेम्पर) असल्याची माहिती त्याच्या वडिलांनी चौकशीदरम्यान पोलिसांना दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

८ तास झोपूनही थकवा जाणवतोय? या आजारांचे असू शकते लक्षण

Blood Vessels: हृदयाच्या रक्तवाहिन्या कमकुवत झाल्यावर रात्रीच्या वेळी पायांमध्ये ही 3 प्रमुख लक्षणं दिसतात

Maharashtra News Live Update : जेजुरी अपघातातील मृतांचा आकडा वाढला

Pune Accident : वारीत पुन्हा भयंकर अपघात, भरधाव कारने वारकऱ्याला चिरडले, जागेवरच मृत्यू

Shocking : धक्कादायक! 'लाडकी बहीण' योजनेच्या पैशातून दागिन्यांचे आमिष; महिलेला पळवून नेऊन बलात्कार

SCROLL FOR NEXT