Mumbai Local Train Crime Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Train Crime: धावत्या लोकल ट्रेनमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; धक्कादायक घटनेनं मुंबई हादरली

सुरज सावंत

Local Train Crime: मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. एकटीने प्रवास करत असताना ट्रेनच्या लेडीज कोचमध्ये घुसून एका नराधमाने २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला आहे. या घटनेत आरोपी व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Crime News)

मुंबई लोकल ट्रेनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मशिद दरम्यान लोकलमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी ७:२८ च्या सुमारास ही घटना घडली आहे. २० वर्षीय तरुणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ट्रेनमध्ये बसली होती. यावेळी ४० वर्षीय पुरुष महिलांच्या डब्ब्यात शिरला. त्याने चालत्या लोकल ट्रेनमध्ये तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न केला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी वेगाने तपासाला सुरुवात केली. घटनेच्या सुमारे ८ तासांनंतर आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती, जीआरपी अधिकाऱ्याने दिली आहे.

तरुणी परीक्षेसाठी निघाली होती

परीक्षा सुरु असल्याने तरुणी सकाळी लवकर घरातून निघाली होती. आपल्याला कोणते प्रश्न विचारले जातील, पेपर सोपा असेल का? असे विचार तिच्या डोक्यात फिरत होते. नियती आपल्या पुढ्यात इतका कठीण पेपर आणेल याची पीडितेला काहीच कल्पना नव्हती.

पीडिता CSMT-पनवेल लोकलच्या द्वितीय श्रेणीच्या महिला डब्यात प्रवास करण्यासाठी बसली होती. ट्रेन सुरू होताच आरोपी डब्यात चढला आणि त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार करण्यासाठी प्रयत्न सुरू केला. विद्यार्थिनीने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्नही केला. एका वृद्ध महिलेने पोलिसांना फोन करणार असल्याचे धमकीही दिली पण आरोपीने काहीच प्रतिसाद दिला नाही. ट्रेन मस्जिद बंदर रेल्वे स्थानकावर येताच विद्यार्थीनीने ट्रेनमधून उतरून स्वतःचा बचाव केला.

जीआरपी आणि आरपीएफच्या संयुक्त पथकाने आरोपी नवाज करीमला ८ तासांत अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलाय. अशा घटनांमुळे आता लोकलमधून सकाळच्या वेळी प्रवास करताना महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित राहिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT